प्राणीसंग्रहालयात राजा बिबट्याची प्राणज्योत मालवली... दुःखाचे वातावरण

राजा बिबट्याची प्राणजोत मालवली...
प्राणी संग्रहालयात घेतला अखेरचा श्वास.... शवविच्छेदन करुन दिला अखेरचा निरोप...
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिका सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील एक बिबट्या नर नामे राजा वय 15 वर्षे हा बुधवारी रात्री मृत पावला आहे. हा बिबट्या मागील दोन महिन्यापासून आजारी होता. राजा या बिबट्याला आमटेज् ऑनिमल आर्क्स, हेमलकसा गडचिरोली येथून 2016 मध्ये प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्यावेळेस त्याचे वय अंदाजे 7 ते 8 वर्षे इतके होते. त्याचा प्राणीसंग्रहालयामध्ये 7 वर्षे वावर होता.
आजारी राजावर प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांचेमार्फत प्रतिदिनी उपचार करण्यात येत होते. या बिबट्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता अहवालानुसार आजारी बिबट्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी रात्री राजाने अखेरचा श्वास घेतला.
या बिबट्याचे शवविच्छेदन आज दि.17, गुरुवारी रोजी सकाळी डॉ. अमीतकुमार दुबे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. रोहीत धुमाळ, व डॉ. महेश पवार पशुधन विकास अधिकारी, शासकीय पशुसर्व चिकीत्सालय यांनी केले. मृत बिबट्याच्या शवाची विल्हेवाट लावण्याकरीता श्री. डी. बी. तौर वनपरिक्षेत्र अधिकारी व श्री. ए. डी. तांगड वन परिमंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. यांचे समक्ष मृत बिबट्याचे शरीर जाळण्यात आले व घटनेचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बिबट्याचा मृत्यु Multi Organ failure ने झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी , अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.
What's Your Reaction?






