स्वच्छता ही सेवा 2024 कार्यक्रमाची भव्य "प्लाॅग रन" नी सांगता
स्वच्छता ही सेवा 2024 कार्यक्रमाची भव्य "प्लॉग रन" नी सांगता
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) महानगरपालिकाने स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवड्यात मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप कार्यक्रम महावीर चौक बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक येथे "प्लॉग रन" द्वारे स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाचे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी, महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी, शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4500 नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत बाबा पेट्रोल पंप ते क्रांती चौक या दरम्यान स्वच्छता मोहिम राबविली. या मोहिमेमध्ये स्वच्छता सेवकांनी 4 टन अतिरिक्त कचरा संकलन केला, तो कचरा महानगरपालिका घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे पाठविण्यात आला.
यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी उपस्थित नागरिकांना शहर स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, सफाई कर्मचारी यांचा गुणगौरव यावेळी त्यांनी केला तसेच नागरिकांनी या स्वच्छता अभियान मध्ये अधिकाधिक सहभागी होऊन शहर स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले. उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सचिन भालेराव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले यावेळी केले.
17 सप्टेंबर पासून चालू झालेल्या या स्वच्छता ही सेवा मोहिमेमध्ये आता पर्यंत 900 पेक्षा जास्त कार्यक्रम पार पडले असून महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
या स्वच्छता मोहिमेमध्ये सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या साठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सर्व प्रकाराची आरोग्य तपासणी रक्त तपासणी करण्यात आली, स्वच्छता कर्मचारी यांच्या जीवनावर आधारीत "अंधे जहाँ हे अंधे रास्ते" या दोन अंकी नाटकाचे तीन शो स्वच्छता कर्मचारी यांच्या साठी आयोजित करण्यात आले होते, तसेच स्वच्छ भारत अभियान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात 500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, "एक पेड माँ के नाम" या कार्यक्रम अंतर्गत जवळपास 8000 पेक्षा जास्त देशी झाडांचे रोपण करण्यात आले, महिला सफाई कर्मचारी व शहरातील महिला वर्गासाठी "खेळ पैठणीचा-जागर स्वच्छतेचा-सन्मान महिलांचा" या कार्यक्रमात 15 विजेत्या महिलांना पैठणी साडी वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाला 2000 महिलांना सहभाग नोंदवला होता, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, मानवी साखळी या कार्यक्रमाअंतर्गत 100 ठिकाणी मानवी साखळी बनवून स्वच्छतेचे संदेश देण्यात आले, स्वच्छतेची शपथ शहरातील सर्व शाळांमध्ये तसेच चौकाचौकात घेण्यात आली, या अभियानात शहरातील सर्व प्रमुख चौकात शहर स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यासाठी जनजागृती करण्यात आली, ऐतिहासिक स्थळांची यावेळी स्वच्छता करण्यात आली, खाम नदीकाठी वृक्षारोपण व नदी परिसर दीप क्लीनिंग करण्यात आली.
या सर्व कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रसाशक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले, ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजन घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी केले होते, राष्ट्रीय सेवा योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालिका डॉ. सोनाली क्षीरसागर व त्याचा एनएसएस टीमचे सहकार्य मोठ्या प्रमाणावर मिळाले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले होते. सनियंत्रण अधिकारी धीरज चव्हाण, सचिन भालेराव, विशाल खरात, किरण जाधव, चेतन वाघ, सुयोग सिरसाठ, तसेच सर्व शिकाऊ स्वच्छता निरीक्षक, तसेच सर्व महाविद्यालय एनएसएस कार्यक्रम अधिकारी, मनपा शालेय शिक्षक-विद्यार्थी, नागरिक, इ उपस्थित होते.
What's Your Reaction?