नामवंत छायाचित्रकार सुनील थोटे यांचे निधन...

नामवंत छायाचित्रकार सुनील थोटे यांचे अकाली निधन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) शहरातील नामवंत वृत्तपत्र छायाचित्रकार, शिवशंकर कॉलनी येथील रहिवासी सुनील आत्माराम थोटे (वय 55) यांचे शनिवारी (दि.7)निधन झाले. त्यांच्यावर मागील 5 दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा अभिजीत, मुलगी हर्षदा, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सांयकाळी कैलासनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मागील 25 वर्षांपासून ते वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांनी विविध दैनिकांमध्ये काम केलेले आहे. त्यांच्या मनमिळावू आणि मेहनती स्वभावामुळे ते सर्व परिचित होते. छायाचित्रकार चंद्रकांत थोटे यांचे ते लहान बंधू होत. सुनील थोटे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?






