मी आयुक्त होणार मुस्लिम विद्यार्थीनीचा आयुक्तांसमोर निर्धार...

 0
मी आयुक्त होणार मुस्लिम विद्यार्थीनीचा आयुक्तांसमोर निर्धार...

मी आयुक्त होणार प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात उमलतंय मोठं स्वप्न...

 

दर शनिवारी मनपा आयुक्त निवासस्थानी विद्यार्थी घालवतात दोन तास...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून “स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल” या प्रकल्पाअंतर्गत मी आयुक्त होणार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दर शनिवारी मनपा आयुक्त यांच्या शासकीय निवास स्थानी राबविला जात आहे. या अंतर्गत दर शनिवारी एका मनपा शाळेचे विद्यार्थी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या निवासस्थानी जाऊन तेथे असलेल्या ग्राउंड वर विविध खेळ खेळतात आणि आयुक्त जी श्रीकांत यांच्या सोबत मुक्त संवाद साधतात आयुक्त ही मनमोकळ्या पणाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात आणि त्यांच्याकडे असलेले खेळाचे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देतात.

या शनिवारी मनपा प्रा. शाळा ब्रिजवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी आयुक्त यांच्या जलश्री निवासस्थानी दोन तास आनंदाने कबड्डी,खो खो, क्रिकेट ,रस्सीखेच असे अनेक विविध खेळ खेळले. आणि खेळता खेळता शिका या साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी या ठिकाणी असलेल्या सर्वात जुनी निजामकालीन पाण्याच्या टाकीचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले त्या टाकी विषयी माहिती जाणून घेतली तेथील टाकी ही फार पूर्वीची असून तेथील भाग उंचावर असल्यामुळे टाकी जमिनीत आहे हे तिचे मुख्य वैशिष्ट्ये आहे आणि ही टाकी 15 लाख लिटर क्षमतेची आहे. या टाकीतून जुन्या शहराला पाणीपुरवठा होतो. टाकीमध्ये पाणी किती आहे याची मोजपट्टी टाकीच्या वरती असून मोजण्याचे तंत्र खूप वेगळे आहे हा विद्यार्थ्याना खूप वेगळा अनुभव आला होता. विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी आज पासून आम्ही आमच्या घरी पाणी आल्यानंतर पाणी वाया जाऊ देणार नाही व शेजाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगू अशी शपथच विद्यार्थ्यांनी घेतली त्यामुळे ही भेट अगदी वेगळी ठरली आहे.

त्या नंतर विद्यार्थ्यांनी आयुक्त तथा प्रशासक महोदय जी. श्रीकांत यांच्या सोबत मन मोकळा संवाद साधला. या प्रेरणादायी संवादामुळे आणि तेथील वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मलाही आयुक्त व्हायचे/ बनायचे आहे अशी भावना निर्माण होत आहे.

  याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ब्रिजवाडी शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी मुस्कान पठाण हिने जी.श्रीकांत यांच्यावर एक कविता सादर केली व त्यामधून तिने शेवटी मी सुद्धा खूप अभ्यास करणार करणार आणि IAS/IPS होणार होणार अशी म्हणाली आणि झाल्यानंतर सर मी तुम्हाला पहिले येऊन भेटणार कारण ब्रिजवाडीची शाळा बंद होणार होती परंतु आपल्या मुळे ती चालू राहिली आणि माझे शिक्षण तेथे होत आहे याचा मला अभिमान आहे.

आणि येथील वातावरण पाहून माझ्या मनातही आयुक्त होण्याचे ,मोठा अधिकारी होण्याची भावना निर्माण झाली आहे म्हणून मी आता या पेक्षाही जास्त अभ्यास करणार आहे आणि आयुक्त /पोलिस आयुक्त होणार आहे असे म्हणताच आयुक्तांनी त्या विद्यार्थिनीचा शाल देऊन सत्कार केला व तिला शुभेच्छा दिल्या. हा स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे आणि नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिजवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे तसेच मुख्याध्यापक तिलोत्तमा मापारी, केशव तांबे ,दिनेश पचलोरे, अंबादास कराळे हे शिक्षक आणि अनिता वाघमारे बालताई उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow