स्मार्ट वीज मिटरचे कंत्राट रद्द होत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरू राहणार - एड अभय टाकसाळ

 0
स्मार्ट वीज मिटरचे कंत्राट रद्द होत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरू राहणार - एड अभय टाकसाळ

वीजेचे स्मार्ट मिटरचे कंत्राट रद्द होत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरू राहणार - एड अभय टाकसाळ...

सरकावर जनतेचा धाक असलाच पाहिजे !

स्मार्ट मीटर व वीज दरवाढी विरोधात जन आंदोलन सुरूच राहणार...

छ. संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 18(डि-24 न्यूज) राज्य सरकार व महावितरण अधिकारी यांना पुरेसा वेळ दिल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही पत्रकार परिषद आयोजित करीत आहे. नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत मोदी 2.0 सरकारने घेतलेल्या निर्णया प्रमाणे स्मार्ट मीटर लागणार आहेत. जोपर्यंत  कंपन्यांना दिलेले स्मार्ट मीटरचे कंत्राट रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत जनआंदोलन सुरूच राहील अशी घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.  

याबाबत असे की, अगोदर महावितरण अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरचे खूपच फायदे आहेत, विज चोरी वगैरे वगैरे गुणगान केले. स्मार्ट मीटर हे प्रीपेड मीटर असणार असे सर्वप्रथम म्हणाले, मग जनतेतून विरोध होतोय, महाराष्ट्रात विधानसभा तीन महिन्यांवर आली, आंदोलन परवडणार नाही म्हणून अधिकाऱ्याला प्रीपेड मीटर सक्तीचे करणार नाही असे जाहीर करायला लावले. तरीही विरोध थांबला नाही म्हटल्यावर भाजपच्या राज्य अध्यक्षाला पत्रकार परिषद घेऊन थाप मारायला सांगितली. विधानसभा निवडणुकीत भाजपा हे निवडून येणारच नाहीत पण आलेच तर पुन्हा शेर होऊन पोलीस बंदोबस्तात स्मार्ट मीटर लावण्याचा धोका आहे. त्यामुळे जनतेचा धाक सरकारवर असलाच पाहिजे. या उद्देशाने स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत देशभरात दिलेले कंपन्यांना दिलेले देशभरातील स्मार्ट मीटरचे कंत्राट जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत जन आंदोलन सुरूच राहील अशी घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. कंपन्यांना दिलेले स्मार्ट मीटर लावण्याचे कंत्राट रद्द केल्याचे कागदपत्रे समोर येत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर विरोधात जन आंदोलन सुरूच राहील. सरकार कोणाचेही असो जनतेचा धाक त्यांच्यावर असलाच पाहिजे, निवडणुकी आधी थापा मारायच्या आणि नंतर महागाई वाढवायची असाच अनुभव आहे. लोकसभा 2024 निवडणूक निकालानंतर लगेच महागाई वाढवल्याचे आपण पाहत आहोत. पंजाब, हरियाणा ,राजस्थान, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन सुरूच आहे. काही ठिकाणी गपचूप येऊन स्मार्ट मीटर लावून गेले, ज्यांना महिना दोन हजार रुपये बिल यायचे त्यांचे रिचार्ज आठ दिवसात संपू लागले, पोस्टपेड मीटर घेतले तर लाख रुपयांचे वीज बिल येऊ लागले. तक्रारींचीही दखल खाजगी कंपनी, सरकारी अधिकारी घेत नाहीत अशा घटना घडत आहेत. स्मार्ट मीटरला जनतेचा विरोध आहे, पोस्ट पेडला एक क्लिकवर प्रीपेड करता येते. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मागील दोन-तीन वर्षांपूर्वीच नवीन मीटर लावले आहेत, आपले मिटर घरातून खांबावर बॉक्स करून लावण्यात आलेले आहे , तेथेच ते केव्हाही गुपचूप किंवा पोलीस बंदोबस्तात स्मार्ट मीटर बसू शकतात. विरोध केला तर खोटे गुन्हे दाखल करू शकतात.  ज्याप्रमाणे मोबाईल कॉल अगोदर मोफत मग एकाधिकार शाही निर्माण करून महाग करण्यात आले, ज्याप्रमाणे महामार्गावर टोल आणि फास्टटॅग द्वारे केव्हाही कितीही दरवाढ करून प्रीपेड सक्तीचे करून लुटले जात आहे तसाच प्रकार विजेच्या बाबतीत करण्याचे षडयंत्र आहे असाही आरोप भाकप ने केला आहे. गोड बोलून थापा मारून एकदा स्मार्ट मीटर लावले की महावितरण आणि खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन वीज ग्राहकाला आयुष्यभर लुटण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. अशा परिस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या थापांवर विश्वास ठेवून जन आंदोलन थांबवता येणार नाही. जन आंदोलन सुरूच राहील असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले आहे. हे जनआंदोलन येत्या 3 महीन्यात कींवा त्यानंंरही स्मार्ट मीटर लागु नये यासाठी आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वीच कंपन्यांना इत्यादींना दिलेले कंत्राट रद्द केले पाहिजे. या पञकार परिषदेत भाकपचे राज्य कार्यकारणी सदस्य व शहर सचिव कॉ. अँड. अभय टाकसाळ शहर सहसचिव कॉम्रेड अनिता हिवराळे, कॉम्रेड जॅक्सन फर्नांडिस, कॉम्रेड विकास गायकवाड, कॉम्रेड जफर जफलु रहमान, कॉम्रेड रफिक बक्ष, कॉम्रेड राजू हिवराळे इत्यादींची उपस्थिती होती.परिषदेत भाकपचे राज्य कार्यकारणी सदस्य व शहर सचिव कॉ. अँड. अभय टाकसाळ शहर सहसचिव कॉम्रेड अनिता हिवराळे, कॉम्रेड जॅक्सन फर्नांडिस, कॉम्रेड विकास गायकवाड, कॉम्रेड जफर जफलु रहमान, कॉम्रेड रफिक बक्ष, कॉम्रेड राजू हिवराळे इत्यादींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow