हिमायतबाग चौकातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले...! चायनीज स्टाॅल काढले

 0
हिमायतबाग चौकातील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढले...! चायनीज स्टाॅल काढले

हिमायत बाग चौकातील चायनीज स्टॉल चे अतिक्रमण काढले...

छ.संभाजीनगर,दि.19(डि-24 न्यूज) अतिक्रमण हटाव पथका मार्फत आज शहरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. महानगरपालिका वार्ड क्रमांक 4 अंतर्गत आणि वॉर्ड क्रमांक 5 सिडको भागात ही कारवाई करण्यात आली. सर्वप्रथम आज सकाळी सदर हिमायत बाग चौक येथील चौकामध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महापालिकेच्या रस्त्यावर सामासिक अंतरातील खुल्या जागेवर व इतर वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अशा ठिकाणी चायनीज स्टॉल सह चार लोखंडी टपऱ्याचे अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण हे मार्च ,एप्रिल 2023 मध्ये ही काढण्यात आले होते परंतु काही लोकांना हाताशी धरून सदर गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण केले व वाहतुकीला आणि सामान्य नागरिकाला अडथळा होईल अशी गर्दी जमवली याबाबत वेळोवेळी तोंडी लेखी सूचनाही दिल्या परंतु त्यांनी प्रशासनाला सहकार्य न करता अतिक्रमण काढले नाही म्हणून आज सकाळी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये सदर अतिक्रमण काढण्यात आले. सदर अतिक्रमण हे 15 बाय 12 आकाराचे चायनीज स्टॉलचे होते. यावेळी पूर्णपणे कारवाई करून जागा मोकळे करण्यात आली आहे.

 दुसरी कारवाई एन-7 सिडको वार्ड क्रमांक पाच अंतर्गत करण्यात आली. एन-7 सिडको भागात कॉम्रेड व्हीं.डी देशपांडे यांच्या नावाने असलेल्या सामाजिक सभागृहच्या लगत नाला वाहणाऱ्या जागेत एका व्यक्तीने पंधरा बाय पंधराचे दोन खोल्या तात्पुरत्या पत्र्याच्या मदतीने तयार करून सदर ठिकाणी तो आपल्या कुटुंबासह राहत होता.

सदर अतिक्रमण काढणे बाबत सुरुवातीपासून त्याला सूचना देण्यात येत होत्या. नेहमी दारू पिऊन तो पथकातील कर्मचारी यांना शिवीगाळ करायचा याबाबत आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सिडको एन-7 चे पोलीस निरीक्षक श्री अतुल येरमे यांनी अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त दिला. त्यामुळे अतिक्रमण आज पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर फिरते पथकाने सायंकाळी मुकुंदवाडी येथे फिश मार्केट व टीव्ही सेंटर भागात कारवाई केली. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे, पद निर्देशित अधिकारी अशोक गिरी ,कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक अश्विनी कोथळकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद पोलीस निरीक्षक श्री गायकवाड यांच्यासह ही पथकाने कारवाई केली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow