मनपा प्रशासकांनी केली शंभुनगर भागाची पाहणी, नागरी समस्या जाणून घेतल्या
प्रशासकांनी केली शंभुनगर भागाची पाहणी,नागरी समस्यांबाबत महिलांचे प्रबोधन केले...
औरंगाबाद,दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शंभू नगर या वसाहतीची पाहणी केली.
यावेळी प्रशासकांनी या भागातील नागरी समस्यांचा आढावा घेतला आणि नागरिकांची तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी विशेषतः महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पाणी, कचरा आणि मोकाट कुत्र्यांबाबत त्यांचे प्रबोधन केले.
सदरील वसाहतीत अर्ध्या भागात महानगरपालिकेची पाण्याची लाईन टाकलेली आहे आणि अर्धा भाग नो नेटवर्क एरिया मध्ये येते. नो नेटवर्क एरियात महापालिकेमार्फत टँकरने पाणीपुरवठा केले जाते.
याबाबत प्रशासकांनी येथील नागरिक विशेषता महिलांचे प्रबोधन करताना सांगितले की नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर त्यांना मुबलक आणि दररोज पाणी मिळेल.
याशिवाय सदरील वसाहतीतून वाहणारे नाल्याची संरक्षण भिंत बांधणे व इतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी झोन क्रमांक 8 चे वार्ड अभियंता संजय कोंबडे, वार्ड अधिकारी भारत बिरारे, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ, या वार्डाचे टॅक्स कलेक्टर इत्यादी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?