आझाद चौक आगीच्या घटनेत नुकसानग्रस्त दुकानदारांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात...!

आझाद चौक आगीच्या घटनेत नुकसानग्रस्त दुकानदारांना राष्ट्रवादीचा हात
एकीकडे औरंगजेब यांच्या कबरीचा विवाद सुरू असताना सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाने भाईचाराचा संदेश देत मुस्लिम समाजाला मदत केली...
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केली मदत
छञपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) शहरातील आझाद चौकाच्या बाजुला असलेल्या जुन्या फर्निचर, भंगारासह अन्य लाकडी वस्तु विक्री व दुरूस्तीसाठी असलेल्या दुकानांना बुधवारी आग लागली. पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत अवघ्या दोन तासात या परिसरातील 17 दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, हातावर पोट असलेल्या दुकानदाराची दररोजची भाकरी बंद झाली. त्यांना पुन्हा उभारी मिळावी व त्यांना नव्याने व्यवसाय उभारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली आहे.
बुधवारी लागलेल्या आगीत आझाद चौकातील 17 दुकाने जळुन खाक झाली त्यात जवळपास 60 ते 65 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व छोटे छोटे व्यावसायिक होते त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले या व्यावसायिकांची दररोजची भाकरी बंद झाली त्यांना या संकटातून सावरण्यासाठी व पुन्हा नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देऊ केली आहे.
आर्थिक मदत केलेल्यांची नावे याप्रमाणे :
इम्तियाज अहेमद, अयुब खान, कलीम शेख, अजमत खान, सय्यद अल्ताफ, शेख सिराज, अफसर पठाण, अन्वर शेख, सरदार भाई, वारीस देशमुख, राजीक शेख, अतिक अहेमद, सय्यद शकीर, सलमान खान, वसीम खान, सय्यद मजीद, मुनव्वर खान आदींना आर्थिक मदत देण्यात आली.
याप्रसंगी वाजीद जहागीरदार, अहेमद जलील, शेख अकबर, प्रविण भोसले, बाबासाहेब साबळे, प्रदीप हारदे उपस्थित होते.
What's Your Reaction?






