शहरात मोकाट कुत्रांचा त्रास कमी होणार, मोकाट श्वानांच्या रेबीज लसीकरण मोहीम सुरु

 0
शहरात मोकाट कुत्रांचा त्रास कमी होणार, मोकाट श्वानांच्या रेबीज लसीकरण मोहीम सुरु

मनपा हद्दीत मोकाट श्वानांस रेबीज लसीकरण मोहीमेची सुरुवात

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिका, मिशन रेबीज, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन, आणि (एनजीओ) संस्थेतर्फे मनपा हद्दीत मोकाट श्वानांस रेबीज लसीकरण मोहीमेस आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास कमी होईल.

आज सकाळी 8.30 वाजेपासून सिल्कमिल कॉलनी, रेल्वेस्टेशन येथून मोकाट श्वानांस रेबीज लसीकरण मोहीमेच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महानगरपालिका व मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मनपाची दोन पथके व होप अँड ॲनिमल संस्थेचे चार पथकामार्फत प्रतिदिनी एक वार्ड याप्रमाणे प्रथम शहरातील बाह्य वार्डाचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. आज रोजी एकुण 160 श्वानांस रेबीज लसीकरण करण्यात आले आहे व 17 श्वानांना श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्याकरिता पकडण्यात आले आहे. सदर लसीकरणामुळे मनपा हद्दीत रेबीजव्दारे शून्य मृत्यू उदिष्ठे साध्य करण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग यांच्या तर्फे श्वान प्रेमींना आवाहन करण्यात येत आहे की, सदर उपक्रमात सहभाग घेण्यास इच्छुक उदा. पशुवैद्यकीय क्षेत्रातील, तसेच कोणत्याही क्षेत्रातील अथवा एनजीओ अशा इच्छुक संस्थेने सेंट्रलनाका येथील पशुचिकितीलय बायजीपुरा येथे आपले नाव व मोबाईल नंबर देऊन आपला सहभाग नोंदवावा ज्यामुळे कार्यक्रम सुलभरित्या पार पाडण्यास मदत होईल.

सदर मोहीम आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार, मुख्य उद्यान अधीक्षक तथा विभाग प्रमुख विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असुन या मोहिमेत प्र . पशुैद्यकीय अधिकारी शेख शाहेद, पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहीत धुमाळ, श्वानदंश प्रतिबंधक योजना प्रविण ओव्हळ, सिईओ, होप अँड ॲनिमल ट्रस्ट जयेश शिंदे, वसीम मिर्जा, लाईफ केअर ऍनिमल शैलेश माने, वन हॅन्ड फॉर व्हॉईसलेस एनजीओ, खाजा शरफोद्दिन, माजी नगर सेवक सिल्कमील कॉलनी जफर खान, मुसा चाऊस, समाजसेवक, तसेच मनपा कर्मचारी सुरेश डोंगरे, सय्यद वसीम, संदीप चौहान ,विशाल सातदीवे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow