प्रभाग क्रमांक 3 काँग्रेसचे उमेदवार शेख सलिम युसुफ यांच्या प्रचारार्थ काढली पदयात्रा...
प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे उमेदवार शेख सलिम युसुफ यांच्या प्रचारार्थ पदयात्रा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 3 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेख सलिम युसुफ यांच्या प्रचारार्थ आज मिल काॅर्नर ते भडकलगेट व दिल्लीगेट पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मतदारांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. यावेळी शेख सलिम यांचे स्वागत केले. त्यांनी जनतेचे प्रश्न यावेळी समजून घेतले. प्रभागात पायाभूत सुविधा व सर्व समस्या महापालिका प्रशासनाकडून सोडविण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेताना सांगितले विरोधी उमेदवार हे काम करणारे नसून जाती धर्माचे राजकारण करुन मते मागत आहे फक्त काँग्रेस पक्ष असा आहे जाती धर्माचे राजकारण न करता विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. प्रभागातील पाण्याचा, आरोग्याचा व शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न सोडवले जातील. येणाऱ्या 15 जानेवारीला पंजा निशानीवर बटन दाबून प्रभागातील चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पदयात्रेत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?