अमित शहा यांच्या विरोधात बसपाचे देशव्यापी आंदोलन
अमित शहा यांच्या विरोधात बसपाचे देशव्यापी आंदोलन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने देशभरात धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेश महासचिव मुकुंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यसभेत जे वक्तव्य केले म्हणून देशातील नागरिकांमध्ये रागाचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून राष्ट्रपती यांनी संविधानाच्या मुल्ल्यांचे रक्षण करत त्या वक्त्याची गंभीर दखल घेत कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रसंगी बसपाचे महासचिव मुकुंद सोनवणे, विजय बचके, अमोल पवार, विष्णू वाघमारे, कुणाल लांडगे, नदीम चौधरी, बाबासाहेब पगारे, गौतम पारखे, प्रेमदास त्रिभुवन, करुणा हिवाळे, प्रल्हाद हिवाळे, राघोजी पुंडगे, सचिन महापुरे, राजु केदारे, विवेक पांढरे, भगवान पवार, मिलिंद येडे, संतोष सिरसाठ, संदीप जोगदंड, संतोष शिरसाट, विजय वाघ, सोनू कांबळे, वैभव भिवसने, आकाश जगताप, सुनील पटेकर, सुनील नवतुरे, चंद्रकांत राऊत आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?