अवैध दारू विक्री करणारे हाॅटेल चालक व जुगार अड्ड्यावर छापा, 7,40,000 मुद्देमाल जप्त

 0
अवैध दारू विक्री करणारे हाॅटेल चालक व जुगार अड्ड्यावर छापा, 7,40,000 मुद्देमाल जप्त

विशेष पथकांकडुन अवैध दारु विक्री करणारे हॉटेल चालक व जुगार अडयावर धाड... 7,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त ..

औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे अवैध धंदे चालविणारे चालकाविरुध्द छापे मारून विरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक हे अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वेरूळ जवळील शार्दुलवाडी परिसरात काही ईसम हे शेतात पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पथकांने दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 00: 15 वाजेच्या सुमारास छुप्या पध्दतीने शार्दुलवाडी येथील अमजत बिसमिल्ला खान यांचे शेतात पाहणी व पडताणी केली असता तेथे काही अतंरावर दुचाकी, अॅटो रिक्षा अशी वाहने पार्किक केलेली दिसुन आली. तसेच शेतातील बंद खोलीच्या बाजुला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली छोटया लाईट बल्बच्या उजेडात काही इसम हे पैशावर पत्याचे सहाय्याने जुगार खेळतांना दिसुन आली. यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता पोलीसांचे अचानकच्या कारवाईने जुगारी इसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे मिळेल त्या रस्त्याने अंधाराचा फायद्या घेवुन सैरावैर पळत सुटले परंतु तरीही पथकातील पोलीसांचे पथकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत खालील नमुद 8 जुगारी ईसामांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेख करीम शेख गणी, वय 38 वर्षे स. वेरुळ ता. खुलताबाद, आसिफ ताहेर खान, वय 47 वर्षे रा. खुलताबाद, हमीद अलीमुद्दीन शेख, वय 40 वर्षे रा. कसाबखेडा ता. खुलताबाद, शेख जाकेर शेख वजीर, वय 38 वर्षे स. सोनखेडा ता. खुलताबाद आकाश शंकर शिंदे, वय 25 वर्षे रा. कसाबखेडा ता. खुलताबाद, सईद अब्दुल सत्तार वय 29 वर्षे रा. वेरुळ, हमीद इब्राहिम शेख वय 53 वर्षे रा. खुलताबाद असे मिळून आले आहेत. नुमद कारवाई मध्ये रोख 25830/- रुपयांसह दुचाकी वाहने, तीन चाकी अॅटो रिक्षा, मोबाईल फोन, पत्ताचे केंट, इतर जुगाराचे साहित्य असे एकुण 701830/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे खुलताबाद येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे खुलताबाद हे करित आहेत.

याचप्रमाणे विशेष पथकाला माहिती मिळाली कि, पोलीस ठाणे शिवुर हचीतील मनूर येथील हॉटेल पवन मराठा येथे मोठ्या प्रमाणावर चोरटया मार्गाने अवैधरित्या ग्राहकांना देशी विदेशी दारुची सरास विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मनूर येथे दिनांक 09/01/2024 रोजी सकाळी 06:30 वाजेला मिळालेल्या माहितीच्या हॉटेल पवन मराठा परिसरात सापळा लावला. यावेळी नमुद हॉटेल मध्ये संशयीत हालचाल दिसुन आल्यानंतर पथकाने अचानक छापा मारला असता हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे यांने हॉटेल परिसरता देशी व विदेशी दारूच्या 180 मिली व 90 मिली च्या सुमारे 665 बॉटल ज्यांची किंमत 37,800/- रूपयांचा लपवून ठेवलेला मिळून आला आहे. अवैध विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेल्या सर्व दारु बॉटल जप्त करण्यात आले असुन हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे वय 55 वर्षे रा. मनूर ता. वैजापुर याचे विरुध्द पोलीस ठाणे शिवुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे शिवुर करित आहे.

नमुद कारवाई ही मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाने विशेष पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow