रेशनचे धान्याचा काळेबाजार, एॅग्रो कंपनीच्या गोडाऊनवर छापा, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेशनचे धान्याचा काळाबाजार, एॅग्रो कंपनीच्या गोडाऊनवर छापा, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) करोडी येथे गजानन एॅग्रो कंपनीच्या गोडाऊनवर पोलिस, अन्न औषधी प्रशासन व पुरवठा विभागाने छापा टाकून कोट्यावधी रुपयांचा रेशनचा तांदूळ व विविध अन्नधान्य जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त नितिन बगाटे व पथकाने ही कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ठिकाणी छापा मारला असता सरकारी धान्याचे पॅकिंग बदलून विक्री केली जात असल्याची माहिती आहे. शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठी शेकडो पोती खाजगी गोडाऊन मधून जप्त केली आहे. पोलिसांच्या या छाप्यात सरकारी धान्य काळ्या बाजारात जाणारा हा प्रकार उघडकीस आला आहे. फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाचे हे धान्य आहे. महाराष्ट्र सोबतच पंजाब सरकारचेही धान्य यामध्ये आहे अशी माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे. अजून मोजनी सुरू आहे किती धान्य आहे हे अजून निश्चित सांगता येणार नाही असे त्यांनी सांगितले. हे धान्य सरकारी पोत्यामध्ये काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात भरले जात होते. वाळूज भागात जेथे गोडाऊनवर छापा टाकला तिथे अशी शेकडो पोती आढळून आले. या गोडाऊनला साळीचा परवाना आहे. म्हणजे साळीमधून धान्य निर्माण करायचे आणि पुरवायचे. मात्र येथे थेट तांदूळ आणि गहु येत होते आणि फक्त सरकारचे लेबल काढून खाजगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात भरले जात होते. सोबतच महिला व बालकल्याण विभागाचे सणादा माता आणि गरोदर मातांना दिले जाणारे पोषण आहारातील पाकिटे सुध्दा याठिकाणी आढळून आले आहे. जवळपास 20 जणांना ताब्यात घेतले आहे. रेशन दुकान व शाळांना जाणारा धान्य आहे. हे धान्य कोठुन आले कोणी आणले आता चौकशीत समोर येईल. किती दिवसांपासून हा काळाबाजार येथे सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पण यामध्ये हात आहे का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे हे आता चौकशीनंतर समोर येईल. घटनास्थळी पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व अधिकारी आणि कर्मचारी येथे ठाण मांडून बसलेले आहेत
.
What's Your Reaction?






