पाणी प्रश्नासाठी सरपंच साडी नेसून डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेत...!

 0
पाणी प्रश्नासाठी सरपंच साडी नेसून डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेत...!

पाणी प्रश्नासाठी सरपंच साडी नेसून डोक्यावर हंडा घेऊन जिल्हा परिषदेत...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) फुलंब्री तालुक्यातील गेवराई गावाचे सरपंच मंगेश साबळे स्टंट करुन अनोखे आंदोलन करण्यासाठी चर्चेत आहे. जलजिवन मिशन अंतर्गत गावाला शुद्ध पाणी देण्याची शासनाची योजना आहे. परंतु चार वर्षे उद्घाटन होऊन झाले तरीही गावात नळाला पाणी मिळत नसल्याने दोन किलोमीटर अंतरावरुन डोक्यावर हंडा घेऊन महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील लोकांनी निवडून दिले त्यांचे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे लाडक्या बहीणी पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या कार्यालयासमोर साबळे यांनी साडी नेसून कळकळीची विनंती केली. 1 कोटी 10 लाखाचा प्रस्ताव पाण्यात फेकून उद्रेक केला. चार वर्षांपासून पाण्याचे पाईप पडून सडले तरीही ठेकेदाराने काम केले. टक्केवारीसाठी तर काम करत नाही ना असा प्रश्न त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये विचारला आहे. अभियंता वाघमारे काम का करुन घेत नाही. निधी का मिळत नाही. ठेकेदार काम करायला तयार नाही हा प्रश्न लवकर सोडवावा उन्हाळा लागणार आहे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यामुळे महीलांचा आणखी उद्रेक होणार आहे याची जवाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow