राजीव गांधी मैदान लगतचे अतिक्रमण जमिनदोस्त

 0
राजीव गांधी मैदान लगतचे अतिक्रमण जमिनदोस्त

राजीव गांधी मैदाना लगतचे अतिक्रमणे जमीनदोस्त

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत आज सिडको भागातील एन फाईव्ह गुलमोहर कॉलनी राजीव गांधी स्टेडियम लगत असलेले सामासिक अंतर पार्किंग मधील अतिक्रमणे निष्काशीत करण्यात आली आहेत.

 सद्यस्थितीत उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ मध्ये दाखल जनहित याचिका 109 2015 अंतर्गत कारवाई सुरूच आहे याचाच एक भाग म्हणून मार्च महिन्यात या रस्त्यावर पार्किंगच्या जागेत असलेले दुकाने बांधकामे निषकसित करण्याची कारवाई करण्यात आली होती. संबंधित म्हणजे रामराव महादू तरटे यांना या वेळेस नोटीस देण्यात आली होती त्यांनी सदर नोटीसला न्यायालय मनपा कोर्टमध्ये आव्हान दिले होते त्यानुसार सदर प्रकरणात सुनावणी झाली. सिडको व महानगरपालिका यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. याबाबत सिडको प्रशासनाच्या वतीने अभिप्राय दिला होता. महानगरपालिकेच्या वतीने वकील जयंत वासडीकर यांनी महापालिकेची सविस्तरपणे बाजू मांडली व सदर बांधकामे अतिक्रमण पार्किंगच्या जागेत असल्याचे म्हणणे मांडले.

 त्यानुसार संबंधित प्रकरण मनाई हुकूम देण्यात आला नव्हता त्यानुसार मागील आठवड्यापासून कारवाई प्रस्तावित होती. 3 दुकाने दुकाने दर्शनी भागातील खुली जागा,घराच्या लगत असलेली खुल्या जागेमध्ये 35x10 आकाराचे किचन वॉशरूम व इतर अतिक्रमण होते. याबाबत संबंधित पंचनामा करून नोटीस देण्यात आली होती.रामराव महादू तरटे यांनी सदर जागेत तीन भाडेकरू ठेवले होते याचा पंचनामांमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता.

  सदर घरमालक हे या ठिकाणी राहत नसून त्यांनी जागा भाडे तत्वावर दिली होती. याबाबत आज मा उपायुक्त मंगेश देवरे , सहायक आयुक्त तथा पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांच्यासह ,अर्जुन गिरामे यांनी सकाळी साडेदहा वाजता जागेची पाहणी केली व संबंधित भाडेकरू यांच्याशी चर्चा करून त्यांना साहित्य काढणे बाबत सूचना केली असता त्यांनी वेळ मागितला त्यानुसार त्यांना दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता .दोन वाजेपर्यंत या लोकांनी आपले दुकानाचे सामान स्वतः काढले नंतर जेसीबीच्या साह्याने सदर तिन्ही दुकाने बाजूचे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढण्यात आली. तसेच राजीव गांधी स्टेडियम लगत एकूण बारा दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्यात आली. या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर दहा बाय दहा बाय पंधरा अशे मोठे ओटे बांधून रस्ता अडवला होता दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकाची गाडी रोडवर लागत असल्याने या रस्त्यावर नेहमी अपघात होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सदर रस्त्यावर नेहमी व्हीआयपी व्यक्तींची वर्दळ असते आणि हा रस्ता खूप लहान झाला होता. सदर अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करून पार्किंगची जागा मोकळी करण्यात आली आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांचे मार्गदर्शनानुसार उपायुक्त मंगेश देवरे ,सहाय्यक आयुक्त तथा पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे ,अर्जुन गिरामे अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद यांनी कारवाईत सहभाग घेतला. इतरही दुकानदारांनी आपले दुकानासमोरील शेड स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे उद्या शनिवारी सुद्धा मोहीम सुरू राहणार आहे व्यापाऱ्यांनी आणि अतिक्रमणधारकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे व स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow