काँग्रेसमध्ये सेक्युलॅरिझम लुप्त होत आहे का...?- मोहंमद हिशाम उस्मानी
मोहंमद हिशाम उस्मानी यांनी काँग्रेसवर साधला निशाणा, कॉंग्रेसमध्ये सेक्युलॅरिझम लुप्त होत आहे का... ?
मध्य प्रदेश मध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या 7 टक्के असताना फक्त दोन विद्यमान आमदारांना तिकीट ! AICC ला सांगितले अल्पसंख्याकांनी तिकीट मागितलेच नाही ! मुस्लिम प्रतिनिधित्व संपवण्याचा केला आरोप, औरंगाबाद नामांतरावरावर सुध्दा दुटप्पी भूमिका....
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अक्रामक भुमिका मांडत असतात...
औरंगाबाद, दि.17 (डि-24 न्यूज) सध्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रदेशात फक्त दोन मुस्लिम विद्यमान आमदारांना तिकीट देवून काँग्रेसने बोळवण केली आहे. या राज्यात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या 7 टक्के आहे त्या प्रमाणे मुस्लिमांना 16 ठिकाणी तिकीट मिळायला हवी होती, पण तसे झाले नाही. जैन आणि सिंधी समाजाची लोकसंख्या 1 टक्का पण नाही तरी त्यांना प्रत्येकी 3-3 विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यामुळे समाजात प्रचंड नाराजी बघायला मिळत आहे. ह्या वर अपले फेसबुक अकाउंट वरुन एका पोस्ट द्वारे कॉंग्रेसचे पूर्व शहर जिल्हा अध्यक्ष व औरंगाबाद नामांतरा विरुद्ध याचिकाकर्ता मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी कॉंग्रेस पार्टी वर निशाना साधला आहे, त्यात त्यांनी लिहिला आहे की " राजकीय क्षेत्रात कांशीराम यांचा नारा 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागिदारी' हा खूप प्रचलित आहे पण कॉंग्रेस पक्षात असे काही होताना दिसत नाही. व काँग्रेसने आपला सेक्युलॅरिझम सोडून हिंदूत्व स्विकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कारण कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमाल नाथ यांनी हिंदू राष्ट्रचे प्रचारक बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा भव्य सत्संग मध्य प्रदेश मधे आयोजित केला होता, मग कोठे गेला कॉंग्रेस चा सेक्युलॅरिझम ? असा आरोप औरंगाबाद नामांतरावर विरोधी याचिकाकर्ते उस्मानी यांनी लावला आहे.
D-24 न्यूजला बोलताना त्यांनी सांगितले की जेव्हा महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता होती तेव्हां उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मा.वि.आ चा काॅमन मिनिमम कार्यक्रमात शहरांची नावे बदलण्याचे निर्णय होणार नाही अणी सरकार फक्त विकासासाठी काम करेल असा उल्लेख असतांनाही जेव्हा त्यांची सरकार अल्पमतात आली तेव्हां फक्त हिंदुत्व कार्ड खेळण्या साठी ऐतिहासिक औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांचे नाव संभाजीनगर अणी धाराशिव करण्याचा निर्णय कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिघांनी सर्व सन्मतीने घेतला.
नंतर महायुतीच्या सरकारने छत्रपती संभाजीनगर नाव करण्याचा निर्णय घेतला. जर कॉंग्रेसने त्या वेळी ह्या प्रस्तावाला पाठींबा दिला नसता तर हा प्रस्ताव कधीही मंजूर झाला नसता. सध्या काँग्रेसच्या नेत्यांकडून लेटर हेडवर व व्यवहारात बिनधास्तपणे नवीन नाव उच्चारले व लिहिले जात आहे, मग काँग्रेसची हि दुटप्पी भूमिका नाही तर काय आहे ? सध्या नामांतरावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे तरीही ते या गैर सेक्युलर कृत्य करत आहे, मग कुठे गेले काँग्रेसचे सेक्युलॅरिझम ? मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर एवढी वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली अणि आज पण काही राज्यात भोगत आहे. एम.पी मधे मुस्लिम नेत्यांना प्रदेश सचिव व महासचिव पदे देऊन त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागू नये अशी परिस्थिती निर्माण केली गेली, तर समाजासाठी विधीमंडळात कोण आवाज उठवणार, अणी त्यांचे प्रश्न कसे सुटतील जेव्हा तुम्ही त्यांना प्रतिनिधित्वच देत नसतील ? असा ही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक मधे ही कॉंग्रेस पक्ष मुस्लिम समाजाच्या जोरावर पूर्ण बहुमताने सत्तेत आला, तरीही अल्पसंख्यक समाजाला उपमुख्यमंत्री पद किंवा आरक्षण मिळाला नाही जे कॉंग्रेसने निवडणूकीत वचन दिले होते. जे कॉंग्रेस नेते कधीही हिंदुत्वाला मानत न होते आज तेच हिंदुत्वची उघड पणे भाषा करीत आहे. मुस्लिम समाजात नाराजी असल्याने एमआयएम सारखे पक्ष काँग्रेस नेत्यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवत आहे असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?