हिशाम उस्मानी यांच्या प्रचारात जम्मू काश्मीरचे आमदार बशीर वीरी
हिशाम उस्मानी यांच्या प्रचारात जम्मू काश्मीरचे आमदार बशीर वीरी
औरंगाबाद, दि.13(प्रतिनिधी) औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार हिशाम उस्मानी यांच्या प्रचारासाठी जम्मू काश्मीरचे नॅशनल काॅन्फरन्सचे आमदार बशिर वीरी यांनी नागरीकांशी संवाद साधला. त्यांनी मार्गदर्शन करताना हिशाम उस्मानी यांनी केलेले सामाजिक कार्य बघून त्यांना शिलाई मशीन समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन करत नागरीकांशी संवाद साधला. त्यांनी मतदारांना सांगितले या मतदारसंघाचा हिशाम उस्मानी यांनी अभ्यास केलेला आहे. जनतेचे प्रश्नांची त्यांना जाण आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या नामांतराचा लढा सर्वांना माहीत आहे. मतदार संघाचे विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचा क्षमता त्यांच्यात आहे. ते सेक्युलर असल्याने सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य अनेक वर्षांपासून करत आहे म्हणून त्यांना आपले बहुमुल्य मत देऊन लोकशाहीच्या या मोठ्या पर्वात मत देऊन संविधानाच्या रक्षणासाठी त्यांना निवडून द्यावे. समाजात तेढ निर्माण करणा-या पक्षाचे उमेदवार मैदानात आहे त्यांना पराभूत करा. असे आवाहन मुख्य प्रचार कार्यालयात मार्गदर्शन करताना केले.
यावेळी सय्यद हमीद, संजय वाघमारे, जलिस अहेमद, सय्यद अहमद, नजीरोद्दीन फारुकी, शेख मोहसीन, फैसल खान, सय्यद राहील, इरफान खान, शेख सलिम, सय्यद अख्तर, सय्यद इम्तियाज, शेख सलिम, अजगर खान, रिझवान खान, शेख अजहर, शेख वसिम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?