मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीचे 8 तर पूर्व मधून डाॅ. गफ्फार कादरी यांना पाठिंबा
मौलाना सज्जाद नोमानी यांचे डाॅ.गफ्फार कादरी यांचा पाठिंबा
रोशनगेटवर जल्लोष... जिल्ह्यातील 9 पैकी आठ जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) मराठा, मुस्लिम, दलित मोट बांधण्याचा या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील व सज्जाद नोमानी, राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनी प्रयत्न केला होता. जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते अद्यापपर्यंत त्यांनी भुमिका स्पष्ट केली नसली तरी मौलाना सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध पक्षांच्या धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. मतदारांनी या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील 288 उमेदवारांना पाठिंबा दिला आहे यामध्ये महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार आहेत. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील 9 जागेपैकी 8 जागेवर महाविकास आघाडीचे तर एक शहरातील जागा सपाचे उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिल्याचे आज पत्रकार परिषदेत मौलाना सज्जाद नोमानी यांनी मुंबईत जाहीर केले.
यामध्ये राज्यात सर्वात चर्चेत असलेली औरंगाबाद पूर्वची विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिला आहे. तर औरंगाबाद पश्चिम मधून महाविकास आघाडीचे राजू शिंदे, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे डॉ.बाळासाहेब थोरात, सिल्लोड महाविकास आघाडी सुरेश बनकर, कन्नड उदयसिंह राजपूत, गंगापूर सतीश चव्हाण, वैजापूर डॉ.दिनेश परदेशी, पैठण दत्ता गोर्डे, जालना अपक्ष अब्दुल हाफिज, नांदेड येथून वंचितचे फारुख अहेमद, मालेगाव एमआयएमचे मुफ्ती इस्माईल, धुळे येथून समाजवादीचे इर्शाद जहागिरदार असे 288 उमेदवारांना यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
What's Your Reaction?