उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस दिव्यांग सेल रस्त्यावर
शहर जिल्हा काँगेस दिव्यांग सेल तर्फे कांतीचौक येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वक्तव्याचा निषेध
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी दिव्यांग लोकांचा अपमान केल्याबद्दल कांतीचौक येथे शहर जिल्हा काँगेस दिव्यांग सेलच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. मागील दोन दिवसांपुर्वी मुंबई येथे दिव्यांग व्यक्तींनी दोन टक्के राजकीय आरक्षणाची मागणी केली होती. त्याला उत्त्तर देतांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्ही जर दिव्यांगांना आरक्षण दिले तर आम्ही काय शेतात कामाला जावे का असा उलट सवाल करुन दिव्यांगांचा अपमान केला. शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिव्यांगांनी अजित पवार यांच्या विरोधात अजित पवार माफी मांगो, अजित पवार राजीनामा दो अशा घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. यावेळी शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, दिव्यांग काँग्रेस सेल चे जिल्हाध्यक्ष मुददसिर अन्सारी, काँगेस दिव्यांग सेल चे शहर अध्यक्ष जकी मिर्झा, दिपाली मिसाळ, अनिस पटेल, डॉ अरुण शिरसाठ, डॉ. पवन डोंगरे, शेख कैसर बाबा, शेख शाहारुख, ऐश्वर्या थोरात, फैसल खान, शेख अजीम, फरवेज खान, जुनेद खान, वाहब चाऊस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?