तीन राज्यांत भाजपची मुसंडी, मोदींचा जादू चालला, कार्यकर्त्यांचा जल्लोष

तीन राज्यांत भाजपची मुसंडी, मोदींचा जादू चालला, कार्यकर्त्यांचा जल्लोष
तेलंगणात काँग्रेसला बहुमत, बिआरएसला मतदारांनी घरी बसवले
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका भाजपाने लढले होते तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चानक्यनिती, जे.पी.नड्डा यांचे मार्गदर्शन यामुळे मतदारांनी कौल दिला अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यालयासमोर जल्लोष करताना शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे.
ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत भाजपाचे कार्यकर्ते, महीला भगिनी यांनी आनंदोत्सव साजरा केला. मोदी...मोदी...अशा घोषणा दिल्या. रस्त्यावर जाणाऱ्या वाहनधारकांना थांबवून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
महीला भगिनींनी फुगडी खेळत जल्लोष केला.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, राजू शिंदे, जालिंदर शेंडगे, दिपक ढाकणे, कुचरु घोडके, राजगौरव वानखेडे, शेख हफीज, दौलतखान पठाण, शेख सलीम, शेख वसीम, अतिक पठाण, शेख इम्रान आदी उपस्थित होते.
महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती...
अॅड माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, मनिषा भन्साळी, मनिषा मुंडे, मीनाताई मिसाळ, शालिनी बुंदे, उज्वला दहिफळे, विनाताई खरे, लता दलाल, सुनंदा निकम, रुपाली वाहुळे आदी उपस्थित होते.
चार राज्यांचा असा निकाल
राजस्थान, भाजपा 115, काँग्रेस 67
मध्य प्रदेश, भाजपा 163, काँग्रेस 66
छत्तीसगड, भाजपा 54, काँग्रेस 36
तेलंगणा, काँग्रेस 64, बिआरएस 39, भाजपा 8, एमआयएम 8
What's Your Reaction?






