राजस्थानात 450 रुपयांत मिळणार गॅस, महाराष्ट्रात महाग का...? - इम्तियाज जलील

 0
राजस्थानात 450 रुपयांत मिळणार गॅस, महाराष्ट्रात महाग का...? - इम्तियाज जलील

राजस्थानात 450 रुपयांत मिळणार गॅस, महाराष्ट्रात महाग का...? - इम्तियाज जलील

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) एक्सिट पोलमध्ये काँग्रेसला पुढे दाखवण्यात आले आणि निकाल आल्यानंतर ते उलटे पडले यामुळे आश्चर्य वाटले. राजस्थानात आता भाजपची सत्ता आली आहे तेथे 450 रुपयांत गॅस मिळणार असे प्रलोभने दाखवून मते घेतली मग महाराष्ट्रात भाजपा महायुतीची सत्ता असताना 900 ते 1000 रुपयांत गॅस मिळत आहे. एकच रुलिंग पार्टीला सत्ता मिळणे लोकशाहीला घातक आहे. आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनात प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा राजकीय पक्षात लागली आहे. इंडिया आघाडीला आता आपली रननिती लोकसभा निवडणुकीत बदलावी लागेल. तेलंगणात बिआरएसने लोककल्याणकारी योजना चालवली तरीही पराभव झाला याची कारणमीमांसा करावी लागेल. काँग्रेसने तेलंगणात पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. एमआयएमने बिआरएस सोबत निवडणूक लढवली पराभवाची कारणे अभ्यास करून बघावी लागेल. तीन राज्यांत भाजपा व एका राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना शुभेच्छा दिल्या आहेत. एमआयएमचे 9 मधून 8 जागेवर तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले त्यांनाही शुभेच्छा देत मतदारांचे व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow