दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढले नामांकित चित्र

दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढले नामांकित चित्र...
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त व महानगरपालिका वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहरातील सहा ते अठरा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाचे आयोजन शहर साधन केंद्र क्रमांक एक सिडको एन 6 येथे करण्यात आले होते.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग मित्र ही संकल्पना राबवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून व महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व धावण्याची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि वेगवेगळे अतिशय छान चित्र या विद्यार्थ्यांनी काढले. तसेच धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी पळण्याचा प्रयत्न केला.
या सर्व सहभगी विद्यार्थ्यांना बक्षिसे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडला जाणार असून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या हस्ते वर्धापन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात केला जाणार आहे व त्यांना बक्षीस दिले जाणार आहे. या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांनी गीत व कविता सादर केल्या.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पालकानी दिव्यांग मित्रामुळे आमचे विद्यार्थी शाळेत येत आहेत. आमच्या मुलाला शाळेत एक चांगला मित्र मिळाल्यामुळे माझा विद्यार्थी दर दिवस शाळेत जायचं म्हणत आहे व शाळेत रमत आहे असे उद्गार पालकांनी काढले.
आजच्या या स्पर्धेसाठी महानगरपालिकेच्या उप आयुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, मुख्याध्यापक संतोष तपकिरी उपस्थित होते
या स्पर्धेचे नियोजन गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी व समावेशित शिक्षण समन्वयक दीप्ती साक्रीकर यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खरात व आभार युवराज बाबजे यांनी मानले
या कार्यक्रमासाठी संदीप शिसोदे, फईम अन्सारी, युवराज बाबजे, गौतम मोकळे सचिन खरात, सुमित चौधरी, काकासाहेब दंडे, निलेश निकम, गणेश लक्कस, अन्सारी के आर, नूतन कातोरे, असमा शेख, मनीषा कुमावत, शिल्पा धमाले, अनिता खरात या विशेष शिक्षकांनी व संजय तुपे,मिलिंद आमले,गजानन बामणे, योगेश जडे आणि अतिक खान यांनी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






