अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणावरील सुनावण्यांना दृकश्राव्यप्रणालीद्वारे प्रारंभ

 0
अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणावरील सुनावण्यांना दृकश्राव्यप्रणालीद्वारे प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.28(डि-24 न्यूज) विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर विभागीय आयुक्त विजयसिंह देशमुख  यांच्या संकल्पनेतुन अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणांवरीलसुनावण्या आज दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीव्दारे प्रारंभ करण्यात आला.           

   छत्रपती संभाजीनगर महसूली विभागातील 8 जिल्हयातील अर्धन्यायीक व सेवा विषयक प्रकरणांवरील सुनावणीला विभागातील पक्षकार व विधिज्ञांना प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागते. त्यामुळे पक्षकार व विधिज्ञांचा वेळ वाया जातो तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. पक्षकार व विधिज्ञांचे वेळ व आर्थिक बोजा कमी होण्यासाठी विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर विभागीय आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतुन सुनावण्यांना ऑनलाईन पध्दतीने सुरुवात करण्यात आली आहे.   

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रलंबित सर्व अर्धन्यायीक प्रकरणांचा सुनावणी बोर्ड व बजावणी बोर्ड अशी विभागणी केली जाते.  बजावणी आणि सुनावणी बोर्डसाठी वेगवेगळे दिवस दिले जातात. सुनावणी बोर्डसाठी सोमवार,मंगळवार व बुधवार तर बजावणी बोर्डसाठी गुरुवार दिवस राखुन ठेवण्यात आले आहेत. 

बजावणी बोर्ड मध्ये नोटीस बजावणी न झालेल्या तसेच कोर्टाचे कागदपत्रे न आलेल्या अपरिपक्व केसेसचा समावेश असतो. बजावणी बोर्ड सहायक महसूल अधिकारी, महसूल सहायक यांच्या स्तरावर चालतो. सुनावणी बोर्ड व फक्त परिपक्व केसेस घेतल्या जातात, ज्यामुळे पीठासीन अधिकारी व विधीज्ञांचा तसेच पक्षकारांचा वेळ वाचतो. सुनावणी बोर्ड वरील केसेस 3 ते 4 सुनावणी मध्ये निर्णया कामी बंद केल्या जातात. निर्णय झाल्यानंतर केसेसचे निर्णय प्रथम EQJ Cout वेबसाईटवर अपलोड केले जातात व नंतर पक्षकारांना प्रमाणीत प्रती दिल्या जातात. त्यामुळे तक्रारी कमी होतात.  

प्रथम टप्प्यात विभागीय आयुक्त व अपर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील अर्धन्यायीक प्रकरणांची ऑनलाईन पध्दतीने सुनावणी होईल. दुस-या टप्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व अपर जिल्हाधिकारी यांच्याकडील अर्धन्यायीक प्रकरणावरील सुनावणी ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा मानस आहे. तिस-या टप्यात विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कडील अर्धन्यायीक कामकाज व चौथ्या टप्प्यात तहसिलदार यांचे कडील अर्धन्यायीक कामकाज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow