डॉ.रफिक झकेरिया यांच्या विकासाच्या माॅडलला पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात - हिशाम उस्मानी

 0
डॉ.रफिक झकेरिया यांच्या विकासाच्या माॅडलला पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात - हिशाम उस्मानी

डॉ.रफीक झकेरिया यांच्या विकासाच्या माॅडलला पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात - हिशाम उस्मानी

डॉ.रफीक झकेरिया यांनी केलेली विकासकामे कधीही विसरता येणार नाही त्यांचे आदर्श घेत पुढील वाटचाल करणार असल्याचे हिशाम उस्मानी यांनी सांगितले....

औरंगाबाद,दि.29(प्रतिनिधी) ऐतिहासिक शहराच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवणारे शिक्षातज्ञ व राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे स्व.डाॅ. रफिक झकेरिया यांच्या विकासाच्या माॅडलला पुढे नेण्यासाठी औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून आलो आहे. आपल्या समर्थकांना वाटत होते राजकीय पक्षांवर आता विश्वास राहिलेला नाही. ऐतिहासिक औरंगाबादचे नामांतर केले आणखी ऐतिहासिक शहराची ओळख पूसण्यासाठी ते काहीही निर्णय घेवू शकतात. म्हणून औरंगाबादचे नाव परत मिळवून देण्यासाठी विधानसभेत जाण्यासाठी हि प्रतिष्ठेची राजकीय लढाई लढण्यासाठी शहरातील नागरिकांनी पाठबळ दिले म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मतांच्या रुपाने आशिर्वाद मिळेल असा विश्वास आहे. धनशक्तीच्या विरोधात मला शहराच्या विकासाची तळमळ घेऊन मतदारांसमोर जायचे आहे म्हणून जनतेचे बळ त्यावेळी मिळाले होते ज्यावेळी मी औरंगाबादचे नाव परत मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होतो तोच आत्मविश्वास घेऊन आता राजकीय लढाई लढण्यासाठी सज्ज झालो आहे अशी माहिती औरंगाबाद मध्य मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी सांगितले.

यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये संजय वाघमारे, सय्यद हमीद, आमेर हुसेन, मुशर्रफ आमेर, शेख मोहसीन, विजय गायकवाड, फैसल कुरेशी, नाजिम अन्सारी, मोहम्मद इरफान, वाहिद ममदानी, सय्यद अरशद अली, अब्दुल वासिद, नजीर फारुकी, निसार खान, एहतेशाम खान, सय्यद राहिल, वसीम अतार, मिनहाज मन्सूर, विनोद उंटवाल, इरफान खान, एड अनिस पटेल, शेख सत्तार, जावेद खान, आसिफ ख्वाजा, मुस्तफा जैद, फहाद सिद्दीकी, फैसल सिद्दीकी, मोहम्मद शहेबाज, गुलाम मोहियोद्दीन व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow