छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन...!

 0
छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन...!

छत्रपती संभाजी महाराज करंडक" राज्यस्तरिय एकांकिका स्पर्धा- 2026

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या राज्यात उत्तमोत्तम कलावंत दडलेले आहेत. या कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा, नवनिर्मिती करणारा, नावीन्यपूर्ण असा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामुळे सांस्कृतिक क्षेत्राच्या कक्षा रुंदावून नवे पर्व सुरू होण्यास मदतच होणार आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे , उप आयुक्त तथा सांस्कृतिक विभागप्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहेत.

एकांकिका स्पर्धेसाठी याप्रमाणे बक्षिसे एकांकिका सांघिक प्रथम पुरस्कार-31 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 21

हजार रुपये, तृतीय पुरस्कार 11 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पुरस्कार प्रत्येकी 5 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह

या प्रमाणे राहील. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना,

रंगभूषा, वेशभूषा या करिता प्रत्येकी प्रथम - 3 हजार रुपये दितीय-2 हजार रुपये, तृतीय- 1 हजार रुपये याप्रमाणे प्रदान

करण्यात येणार आहेत. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अंतिम प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येकी नोंदणी शुल्क

500/- रुपये असून स्पर्धकांना स्वतः सर्व नाट्य साहित्य सोबत आणावे लागणार आहे.

तरी जास्तीत जास्त कलाकारांनी छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले आहे. प्रवेशिका व अधिक माहितीकरिता

स्पर्धकांनी 9890094039, 8208899835, 9422211107 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow