मंत्री अतुल सावे व डॉ.गफार कादरी आले एका कार्यक्रमात एकत्र...!
मंत्री अतुल सावे आणि डॉ.गफार कादरी यांची एका कार्यक्रमात भेट...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - एक दुस-याच्या विरोधात औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीनदा निवडणूक लढवणारे मंत्री अतुल सावे व डॉ.गफार कादरी हे चिश्तिया काॅलनी येथे एका कार्यक्रमात एकत्र आले. दोघांनी गळाभेट करत हातात हात घेऊन समाजात एक चांगला संदेश दिला आहे. राजकारणात विरोध असतो पण भारतीय संस्कृतीत एकमेकांचे शत्रु नसतात याचे हे एक उदाहरण आहे.
आज सकाळी 11 वाजता बीग शु मार्कचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाॅपचे मालक ए.बी.अन्सारी यांनी सर्व राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते यावेळी सावे आणि कादरी यांची भेट झाली व दोघांनी यावेळी संवाद साधला.
या भव्य उद्घाटन कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलिल
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, उर्दू दैनिक हिंदूस्थानचे संपादक नायाब अन्सारी, विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक बाबा बिल्डर, आय लव्ह औरंगाबाद फाऊंडेशनचे अध्यक्ष इरबाज अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती हो
ती.
What's Your Reaction?