प्रोफेसर शेख अब्दुल रहेमान सर यांच्या स्मरणार्थ केले वृक्षारोपण

 0
प्रोफेसर शेख अब्दुल रहेमान सर यांच्या स्मरणार्थ केले वृक्षारोपण

प्रोफेसर शेख अब्दुल रहेमान सर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.7(डि-24 न्यूज) स्व.प्रोफेसर शेख अब्दुल रहेमान सर यांच्या स्मरणार्थ आज वृक्षारोपण कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे महासचिव डॉ. शादाब अब्दुल रहेमान शेख यांच्या वतीने चित्तेखाना कब्रस्तान परिसर टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम सीनियर काँग्रेस नेते इकबाल सिंग गिल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारची झाडे आणि रोपे कब्रस्तान परिसरात लावण्यात आली.

या कार्यक्रमात वरिष्ठ नेते हमद चाऊस, युवा काँग्रेसचे सागर मुगदिया, काँग्रेस प्रवक्ता मसरूर खान, आमेर रफीक खान, डॉ. नासेर शेख, शहजाद जैदी, जब्बार शेख, औरंगाबाद युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद सलमान, हाफिज सिद्दीकी, डॉ. फैसल शेख, डॉ. शुभम हजारी, शेख असर, अॅडव्होकेट अरमान शेख, बाबा, युसूफ खान, मनोज पाटील, कैलास राठोड आदि लोक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow