काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई, काँग्रेस रस्त्यावर

 0
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई, काँग्रेस रस्त्यावर

द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने खा.सोनिया गांधी व विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांच्यावर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने....

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.17(डि-24 न्यूज) मोदी सरकारने सूडबुद्धीने आणि द्वेषपूर्ण राजकारणातून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली आहे. याचप्रमाणे, काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांविरोधात खोट्या प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल करून केंद्र सरकारने सत्तेचा उघड उघड गैरवापर केला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात मोदी गो-बॅक, सरकार मुर्दाबाद, भाजप हाय हाय, नही चलेगी - नही चलेगी - हुकूमशाही नही चलेगी आदी घोषणा मोठ्या प्रमाणावर देऊन परिसर दणाणून सोडले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ, प्रदेश सरचिटणीस डॉ. जफर अहेमद खान, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, भास्कर घायवट, संदीप बोरसे, इब्राहीम पठाण, इकबालसिंग गिल, आकेफ रजवी, अ‍ॅड.सय्यद अक्रम, विनोद तांबे, आमेर अब्दुल सलीम, शेख अथर, अनिस पटेल, अरुण शिरसाठ, इंजि. विशाल बन्सवाल, कांचनकुमार चाटे, कैसर आझाद, अतिश पितळे, सागर नागरे, निमेश पटेल, अनिता भंडारी, रेखा राऊत, दीपाली मिसाळ, कैसर बाबा, संतोष शेजूळ, शेख युनुस, सूर्यकांत गरड, राहूल सावंत, राहूल संत, प्रकाश सानप, अकिल पटेल, पुंडलिक जंगले, संतोष शेजूळ, आबेद जहागीरदार, दिलीपराव भोसले, पप्पूराज ठुबे, अशोक डोळस, मुद्दसिर अन्सारी, सय्यद फयाजोद्दीन, सलीम खान, निसार अहेमद, योगेश थोरात, मुजफ्फर खान, श्रीकृष्ण काकडे, शेख रईस, बाबुराव कवसकर, शेख अमजद, शफिक शहा, जकी मिर्झा, संतोष भिंगारे, विशाल डिंडोरे, अजय डिंडोरे, शकुंतला साबळे, समिना तडवी, चंदा सुर्यवंशी, ज्योती कंठे, उषा खंडाळे, प्रविण देशमुख, तारा जाधव, रेखा भुईगळ, सिमा मदने, निर्मला सुरडकर, हरिभाऊ राठोड, सलीम पटेल, जाफर शेख, संदीप नवगिरे, रमाकांत गायकवाड यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow