महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन...

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित अभिवादन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- महानगर पालिकेच्या वतीने आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित अभिवादन करण्यात आले.
सकाळी शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप आयुक्त नंदकिशोर भोंबे, लखीचंद चव्हाण, सहायक आयुक्त फईम अन्सारी ,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती.
तसेच मनपा मुख्यालय येथे लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस उप आयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुरक्षा अधिकारी बाळू सोनवणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व सुरक्षा कर्मचारी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






