ऑटो चालकाचा खून जुन्या वादातून, मारेक-यांपैकी दोन आरोपी अटक...

ऑटो चालक इम्रानच्या मारेकऱ्यांपैकी दोन अटक, जुन्या वादातून खून...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - काल 1 ऑक्टोबर रोजी रात्री रेल्वेस्टेशन जालान नगर उड्डाणपुलाखाली रिक्षाचालक सय्यद इम्रान सय्यद शफीक (वय 38, राहणार सादात नगर, छत्रपती संभाजीनगर) याचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून जुन्या वादातून झाला आहे. या प्रकरणी इम्रानच्या भावाच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पडेगाव येथील रहिवासी सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन, सय्यद सद्दाम सय्यद मोईनोद्दीन, सय्यद मोसीन सय्यद मोईनोद्दीन, शाहरुख कुरेशी, आतिक कुरेशी, अन्वर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. फरार आरोपिंचा पोलिस शोध घेत आहे.
कुटुंबाने शवविच्छेदनानंतर शव थेट पोलिस आयुक्तालयात आणल्याने खळबळ उडाली. कुटुंबाने पोलिस अधिकाऱ्यांसमोर आक्रोश केला. छावणी पोलिस ठाण्यात अगोदर झालेल्या वादानंतर कुटुंबाने हत्या करणा-यां विरोधात तक्रार दाखल केलीली होती. अगोदर पोलिसांनी कारवाई केली असती तर इम्रानला जीव गमवावा लागला नसता. दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. इम्रानला लहान लहान दोन मुले एक मुलगी आहे. कुटुंबाचा आधार गेला आहे असा आक्रोश कुटुंबाने केला. आरोपिंना अटक करुन कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली. पोलिस अधिका-यांनी समजूत काढत कार्यवाईचे आश्वासन दिले त्यानंतर इम्रानचे शव दफनविधी साठी नेण्यात आले.
What's Your Reaction?






