डिसिपि बगाडेंच्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले, जुगार अड्ड्यावर छापा
डिसिपि बगाडेंच्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले, जुगार अड्ड्यावर छापा
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) रांजणगाव शेणपूंजी 23 नोव्हेंबर रोजी छापा टाकून 20 लाखांची अवैध दारु पकडली, दौलताबाद पोलिस ठाण्याचे हद्दीत गांजाची शेतीवर छापा, आज जुगार अड्ड्यावर छापा टाकल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. डिसिपि नितीन बगाटे यांनी पदभार सांभाळला तेव्हापासून अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या काही अंतरावर त्यांनी व सहका-यांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारुन आज उशीरा रात्री 40 लोकांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. एकामागून एक कार्यवाही मुळे गुन्हेगारांना पोलिस प्रशासनाचा चांगलाच धसका बसला आहे. डिसिपि, एसिपि, पिआय, पिएसआय एकाचवेळी अचानक छापा मारले असता बघ्यांची तोबा गर्दी घटनास्थळी जमली होती.
लाॅजिंग आणि हाॅटेलचा बोर्ड लावून भोईवाडा येथे सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या पत्त्यांचा क्लब पोलिसांनी उध्वस्त केला. मागिल 8 दिवसांपासून कार्यवाहीचा धडाका लावलेल्या पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी कर्मचाऱ्यांसह छापा मारला.
राम बोडखे नामक इसम क्लब चालवत होता त्याचे सहीत व्यवस्थापक आणि 40 जुगा-यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती डि-24 न्यूजला क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे.
यावेळी लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जवळपास तीन लाख रोकड येथे सापडली. रात्री उशिरापर्यंत आरोपींची नावे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. करमणूक कराच्या नावाखाली हे क्लब चालवले जाते. बोर्डावर कन्नड कल्चरल सेंटर त्याचा शासकीय नोंदनी क्रमांक, सोशल क्लब, कार्ड रुम रम्मी सभासदांसाठी असे नमूद करुन मुंबई उच्च न्यायालयाची ऑर्डर असा उल्लेख आहे.
पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, अंमलदार इरफान खान, संतोष मुदिराज यांनी आरोपींना ताब्यात घेतले.
What's Your Reaction?