करंजखेडा येथून युवकाचा अपहरणाचा डाव ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेने फसला, सहा आरोपी अटक
 
                                करंजखेडा येथून अपहरण करुन घेऊन जाणाऱ्या 6 जणांना पोलीसांनी नाकाबंदी करुन घेतले ताब्यात व अपहरणकर्त्याची केली सुटका...
पोलीस ठाणे पिशोर यांची कारवाई...
कन्नड, दि.28(डि-24 न्यूज) पोलीस ठाणे पिशोर येथील प्रभारी अधिकारी श्री शिवाजी नागवे यांना बीट अंमलदार पो.ह. पंढरीनाथ इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास सोनवणे, वसंत पाटील, गजानन कऱ्हाळे व करण म्हस्के यांना - दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या इरटिगा गाडीमधील लोकांनी करंजखेडा येथुन एका मुलाला चाकुचा धाक दाखवुन किडनॅप केले आहे व ती इरटिगा गाडी हि साखरवेल फाटयाकडे येत आहे. तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी करुन, इरटिगा गाडीला थांबवून, अपहरणकर्त्यांची सुटका करावी असे 01.10 वाजता आदेशीत केल्याने, नमुद पोलीस अंमलदार यांनी तात्काळ साखरवेल फाटयावर नागरीकांच्या मदतीने नाकाबंदी करुन, अपहरण झालेल्या मुलांची सुटका केली व अपहरण करणाऱ्या 6 जणांना व इरटिका गाडी क्रमांक MH-43 AN- 3922 हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले आहे.
अधिक माहिती अशी की, अपहरण झालेला फिर्यादी वय 26 वर्षीय युवक रा. करंजखेडा ता. कन्नड यांचे एका प्रकरणात त्यांनी आपसामध्ये समझोता करुन मिटविले होते. मोटार सायकलने घरुन, गांवामध्ये मस्जिदमध्ये नमाज पडण्यासाठी जात असतांना, अपहरण करणारे 6 इसमांच्या इरटिंगा गाडीने रस्ता आडवुन, त्या युवकाला चाकुचा धाक दाखवून कारमध्ये बसवले असे म्हणून चापटबुक्याने मारहाण करुन, बळजबरीने गाडीमध्ये टाकुन, अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिलेली असुन, अपहरण करणारे सैय्यद मोहम्मद सय्यद, शोएब अली मंजुर अली सय्यद, मोसीन खॉजा शेख, सुलतान गुलाब तांबोळी, सैय्यद युसुफ मोहम्मद, सैय्यद जुनेदअल्ली मन्सुरअली सर्व रा. बेलापुर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर(अहमदनगर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पो.उप.नि. श्री आर आर डोईफोडे हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधिक्षक श्री सुनिल लांजेवार , उप विभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.श्री शिवाजी नागवे, पोउपनि रत्तन डोईफोडे, पोलीस हवालदार पंढरी इंगळे, विलास सोनवणे, वसंत पाटील, गजानन कन्हाळे व करण म्हस्के, मच्छिद्र देवरे, गणेश कवाल यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            