पोलिसांची धाडसी कारवाई, पंजाब हत्याकांडातील 6 शुटर आरोपिंना शिताफीने पकडले
पोलिसांची धाडसी कारवाई, पंजाब हत्याकांडातील 6 आरोपिंना शिताफीने पकडले
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) पंजाब राज्यातील फिरोजपूर येथील गॅंगवार हत्याकांडातील 6 आरोपिंना छ.संभाजीनगर(औरंगाबाद) पोलिसांनी धाडसी कारवाई करत जीवाची पर्वा न करता सावंगी टनेल, समृध्दी महामार्गावर पकडले.
त्या हत्याकांडात एकाच कुटुंबातील तीन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये एका मुलीचे काही दिवसांत लग्न होते तीही या हत्याकांडात मृत्यूमुखी पडली होती.
या गोळिबारातील आरोपी शुटर आज पहाटे नांदेड येथून इकडे येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांना मोबाईलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG प्रमोद बान यांचा फोन आला. त्यांनी सांगितले गंभीर आणि तातडीची मदत हवी.
सिएसएन पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट घालून पहाटे MH-26, AC-5599 क्रमांकाची इनोव्हा आरोपिंनी भरधाव वेगाने पळवलेली या गाडीला सकाळी 5.45 वाजता रोखले. चित्रपटात दाखवण्यात येणारा असा हा सिन होता. अत्यंत धाडसी योजना आखून पोलिस निरीक्षक क्राईम ब्रांड संदीप गुरमे, सिडकोचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली 10 अधिकारी, 40 कर्मचाऱ्यांची टिमने, QRT सह सज्ज होऊन आरोपिंना शस्त्रांनी सुसज्ज असतांनाही त्यांच्या हिशोबाने घेरले. आरोपी शुटरकडून गोळ्या कधीही सुटु शकल्या असत्या पण अत्यंत दक्ष राहुन त्यांना पकडण्याची कार्यवाही फत्ते केली.
पंजाब पोलिसांना आज संध्याकाळी ताब्यात दिले जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
D24NEWS English News....
Courageous action by police, 6 accused in Punjab murder case arrested by city police
Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad) ,Sep 7 Six escaped accused in Gangwar massacre in Ferozepur of Punjab state were caught by police of Chhatrapati Sambhajinagar wee hours on Saturday without caring for their lives at Savangi Tunnel, Samrudhi Expressway near here.
According to the police ,in that massacre, three members of the same family were shot dead. A girl was getting married in a few days and she also died in this massacre.
City police Commissioner Pravin Pawar received a call from ADG Pramod Ban of Punjab Police AGTF on his mobile phone informing that the accused shooter in this shooting was coming here from Nanded early this morning and sought the urgent help from police .
The Chhatrapati Sambhajinagar police wearing bulletproof jackets intercepted the speeding vehicle of the accused around 5.45 am. This was the scene that will be shown in the movie. A team of 10 officers, 40 employees under the leadership of Police Inspector Crime Brand Sandeep Gurme, Police Inspector Gajanan Kalyankar of CIDCO, armed with QRTs surrounded the accused even though they were armed with weapons. The bullets could have escaped from the accused shooter at any time but being very vigilant, action was taken to nab them.
Police Commissioner Pawar informed that the Punjab Police will be taken into custody them by this evening.
What's Your Reaction?