गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
गणेश उत्सव मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी...
पाईपवर लोबणारे वायर्स तात्काळ काढून घ्या : आयुक्त जी श्रीकांत
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) गणेशोत्सव दहा दिवस केवळ शहरातच नव्हे, तर अख्ख्या देशभरातील वातावरण भारावलेले असते. देखावे, मेळे, विविध संगीत कार्यक्रम असा आबालवृद्धांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणारा हा उत्सव होय. दहा दिवस मोठ्या आनंदात साजरे केले जातात. विघ्ने दूर सारण्यासाठी भक्तिभावाने लोक या उत्सवात ‘श्रीं’ची भक्ती करतात;परंतु गांधी पुतळा ते गुलमंडी औरंगपुरा भागात पाईपवर लोभणारे वायर्सच्या अवकृपेने मिरवणुकीवर केव्हाही संकट येऊ शकते अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते 15 सप्टेंबरच्या आत काढून घ्या अन्यथा महापालिका यावर कारवाई करेल असा इशारा महापालिका आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांनी दिला आहे.
गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने महापालिकेला प्रशासनाच्या वतीने शहरातील मिरवणूक मार्गची पाहणी काल संध्याकाळी 7 वाजता करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन बगाटे तसेच शहरातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची उपस्थित होते.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाविकांना विसर्जन मिरवणूकीत कुठलीच अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत लोंबत असलेल्या तारा वायर्स अतिक्रमण ज्याचे आहेत. त्यांनी काढून घ्यावे अन्यथा महापालिका ते काढून टाकेल असा इशारा आयुक्तांनी संबंधित भागातील नागरिकांना तथा व्यापाऱ्यांना दिला. याशिवाय मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे आणि झाडांच्या फांद्या छाटून घेण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. या आदेशाची अमलबजावणी करून आज शाहगंज ते औरंगपुरा मार्गावर झाडांच्या लांबलेल्या फांद्या छाटण्याचे काम उद्यान विभागामार्फत करण्यात आले.
What's Your Reaction?