शतकमहोत्सवी श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात "श्री"चिं प्रतिष्ठापना

 0
शतकमहोत्सवी श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात "श्री"चिं प्रतिष्ठापना

शतकमहोत्सवी श्री गणेश महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात “श्री”चिं प्रतिष्ठापना

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) | दि.7(डि-24 न्यूज) शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या “श्री”चिं विधिवत पूजा करून महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रतिष्ठापना शनिवारी (दि. 7) करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया चा जायघोषात आरती करून सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धी आरोग्य मिळू दे असे साकडे गणरायाला घातले. 

यावेळी बंडू पुजारी यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापणा केली. माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ, हरिश्चंद्र लघाने पाटील, तुषार शिसोदे, पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्य्क पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव, शतक महोत्सवी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, किशोर तुळशी बागवाले, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, निखिल चव्हाण, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, यांची उपस्थिती होती. प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, सुमित दंडुके यांची उपस्थिती होती.

उद्या महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, खो-खो, कबड्डी स्पर्धा

शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढवा या उद्देशाने उद्या सोमवार, (दि.9) सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता क्रांती चौक येथून महापुरुषांच्या स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात येईल तर सकाळी 10 वाजता संभाजी पेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर 17 वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांच्या सहभाग असणाऱ्या खो-खो तसेच भव्य कबड्डी स्पर्धा होतील. हे तिनही उपक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात अयोजीते केले असून यावेळी शहरातील लोकप्रतिनिधींची, प्रशासकीय अधिकारी तसेच श्री गणेश महासंघाचे आजी माजी अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष, महिला समिती, चिटणीस, सरचिटणीस, प्रमुख सल्लागार, युवा सचिव यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या उपक्रमात श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow