गुंठेवारीच्या विरोधातील लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा, खैरेंनी घेतली भेट
गुंठेवारीच्या विरोधातील लाक्षणिक उपोषणाला नागरिकांचा प्रतिसाद
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद )दि.23 (डि-24 न्यूज) सातारा व देवळाई गावातील नागरिकांनी महापालिकेच्या गुंठेवारी नियमितीकरणाला विरोध केला आहे. शासन नियमान्वये या नागरिकांना गुंठेवारी करून घ्यावीच लागेल, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ठणकावून सांगितल्यानंतरही येथील गुंठेवारीविरोधी कृती समितीने विरोध कायम ठेवला आहे. या समितीने शासनाच्या गुंठेवारी कायद्याच्या विरोधात रविवारी बीड बायपास रोडवरील उड्डाणपुलाखाली लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
गुंठेवारीच्या विरोधात सातारा-देवळाईतील नागरिक उपोषणाला बसताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन त्यांच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले. सातारा देवळाई भागाला गुंठेवारी लागू करू नये, यासाठी आवाज उठवणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. यावेळी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, माजी महापौर सुदाम सोनवणे, माजी जि. प. सदस्य रमेश गायकवाड, विधानसभा संघटक दिग्वीजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख राजू इंगळे, शिवा लुंगारे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहर युवाधिकारी अजय चोपडे, आदित्य दहिवाल, उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, संतोष जाटवे आदींची उपस्थिती होती.
सातारा व देवळाई भागातून आतापर्यंत गुंठेवारी नियमितीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत मनपाकेडे प्राप्त संचिकांमध्ये सर्वाधिक संचिका या सातारा व देवळाई भागातूनच दाखल झाल्या असून मंजूर देखील झाल्या आहेत. मात्र यातच मूळ गावठाणातील मालमत्ताधारकांनी गुंठेवारीविरोधात आवाज उठवला आहे. सातारा व देवळाई भागातील नागरिकांनी तत्कालीन सर्व शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरे बांधलेली आहे. सातबारा, नमुना-८ (अ) उतारा, ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी, प्लॉटची रजिस्टी करण्यात आली आहे. घरे बांधण्यासाठी बँकांनी गृहकर्ज देखील मंजूर केली आहेत. यामुळे सातारा, देवळाई भागाला गुंठेवारी कायदा लागू होत नाही, अशी भूमिका पुन्हा एकदा आंदोलकांनी उपोषणादरम्यान प्रसार माध्यमांसमोर मांडली. मनपा गुंठेवारी करुन घेण्याची सक्ती करू पाहत आहेत. मात्र याविरोधात आमचा आवाज कायम राहणार असून शासनाने गुंठेवारी कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी संयोजन समितीचे रविंद्र पिंगळीकर, प्रा. स्मिता अवचार, सविता कुलकर्णी, प्रा. भारती भांडेकर, कल्पना राजपूत, प्रा. एकनाथ साळुंके, लक्ष्मण शिंदे, असद पटेल, अॅड. सुधीर कुलकर्णी, राजेंद्र कुमावत, राजेंद्र फिरोदिया, मारूती वीर, आर.टी. भुकेले, आबासाहेब देशमुख, महेश चिद्रवार, पद्मसिंह राजपुत, शरद देशपांडे, अनंत सोन्नेकर, नामदेव पवार, दिलीप भोपे, अश्विनी बेंद्रे, अनिरुद्ध जागीरदार, सुनिल गुट्टे, मीनल ईप्पर, बाजीराव गाडे यांच्यासह अनेकजण सहभागी झा
ले होते.
What's Your Reaction?