सातारा-देवळाईकरांच्या गुंठेवारी विरोधात सुरू आंदोलनाला अंबादास दानवेंचा पाठिंबा
सातारा-देवळाईकरांच्या गुंठेवारी विरोधात सुरू आंदोलनाला अंबादास दानवेंचा पाठिंबा...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.23(डि-24 न्यूज) महानगरपालिका आख्यातरीत येणाऱ्या सातारा देवळाई परिसरातील नागरिकांनी गुंठेवारी कायद्यातून सदरील परिसर वगळण्यात यावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली.
आगामी पावसाळी अधिवेशनात सदरील परिसरातील नागरिकांचा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची सूचना करून मी तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास अंबादास दानवे यांनी आंदोलकांना दिला.
What's Your Reaction?