नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी

 0
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी

मंत्री सावेंनी घेतला पाणीपुरवठा योजनेचा आढावा

कामाच्या सद्यस्थितीची केली पाहणी

छ. संभाजीनगर(डि-24 न्यूज) शहराला मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी नवीन पाणी पुरवठा प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून शहराचा विस्तार आणि येथील नागरिकांना आवश्यक मुबलक पाणी मिळावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेची कामे गतीने सुरू आहेत. येथील नागरिकांना लवकर मुबलक पाणी देण्यासाठी सुरू असलेली योजनेतील कामे अधिक गतीने पूर्ण करण्यात याव्या अशा सूचना राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

पैठण आणि नक्षत्रवाडी येथील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत मंत्री श्री. अतुल सावे यांनी रविवारी आढावा घेतला.  

 यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी सर्व कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना चांगलंच धारेवर धरलं आणि त्यांना खडे बोल सुनावत त्यांची चांगलीच कान उघडनी केली. गेल्या काही वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न हा प्रलंबित असल्याने सातत्याने शहरातील नागरिक हा प्रश्न विचारत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी ) जायकवाडी येथे जाऊन मंत्री श्री अतुल सावे यांनी चालू असलेल्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान यावेळी मंत्री श्री अतुल सावे यांनी धीम्या गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

येणाऱ्या अधिवेशन च्या काळात शहरातील पाणी प्रश्ना बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आज हा आढावा घेण्यात आला. पाहणी प्रसंगी महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए बी देशमुख, के एम फालक, एम बी काझी, दीपक कोळी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी त्याच बरोबर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सोबत नागरिकांची उपस्थिती

होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow