तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

 0
तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, सहकार्य करण्याचे महापालिकेचे आवाहन

तांत्रिक अडचणी मुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज )शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या १०० दलली व ५६ दलली योजनेवरील नवीन व जुने फारोळा पंपगृह येथे दि.०६/०६/२०२४ रोजी वारा व पाऊसामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सायंकाळी ०७:३० वा. वाजता पंपींग बंद झाली. याबाबतीत म.रा.वि.वि. कंपनीच्या अभियंत्यास कळविले असता त्यांच्यामार्फत म.रा.वि.वि. च्या फिडरवर Three Phase Short झाल्याचे कळविण्यात आले. यानंतर म.रा.वि.वि. मार्फत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर प्रत्येक फिडरची स्वतंत्र चाचणी घेऊन Supply Stand करुन रात्री ०८:४५ वा. पंपींग पुर्ववत करण्यात आली.

त्यानंतर पुन्हा वारे व पावसामुळे म.रा.वि.वि. ३३ के.व्ही. Cut Point वरील Insulator वर Sparking झाल्याने म.रा.वि.वि. कडुन होणारा विद्युत पुरवठा रात्री २२:२० वा. खंडीत झाला. म.रा.वि.वि. कंपनीकडुन विद्युत पुरवठा पुनर्संचयित करण्यात आल्यानंतर चेक केले असता नवीन फारोळा उपकेंद्र येथील Main RMU Unit ट्रीप झाल्याने व Master Relay वर Earth Fault Problem दर्शवत असल्याने Relay सेट करुन फिडर ट्रायल घेतली असता पंपींगमध्ये ट्रीपींग येत होती. त्यामुळे १०० दलली योजनेवरील प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची स्वतंत्र चाचणी घेऊन LT Panel Checking, AB Switches Checking व Master Relay Set करुन दि.०७/०६/२०२४ रोजी रात्री ०१:२० वा. पंपिंग पुर्ववत सुरू करण्यात आली.

परिणामी दिनांक ०६/०६/२०२४ गुरूवार ते ०७/०६/२०२४ शुक्रवार रोजी १०० व ५६ दलली योजनेवर एकुण ४ तास १५ मिनीटे खंडणकाळ झाल्याने या काळात पाणी उचल पुर्नतः बंद होती.

यामुळे शहराचा पाणी पुरवठा काही कालावधीकरीता विस्कळीत होणार आहे. या दरम्यान नागरीकांनी सहकार्य करावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow