हर्सुल येथे नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्याची नगरसेवकाची मागणी...
हर्सुल येथे नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्याची नगरसेवकाची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - प्रभाग क्र.1 हर्सुल अंतर्गत फुलेनगर, करीमनगर, एकबालनगर येथे नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्यासाठी नगरसेवक अजहर पठाण यांची मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे मागणी.
प्रभाग क्र.1 हर्सुल परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या भागात नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपचारासाठी दूर अंतरावर जावे लागत आहे.
सध्याच्या परिस्थितीत प्राथमिक उपचार, लसीकरण, माता‑बाल आरोग्य सेवा, नियमित तपासणी तसेच आपत्कालीन उपचार यांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज आरोग्य केंद्र असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 1 हर्सुल अंतर्गत फुलेनगर, करीमनगर, एकबालनगर येथे नवीन आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अजहर पठाण यांनी केली.
नवीन आरोग्य केंद्र स्थापन झाल्यास या परिसरातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील, तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
यावेळी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नवनिर्वाचित नगरसेवक अजहर पठाण यांचा सत्कार केला.
What's Your Reaction?