शहराच्या प्रारुप आराखड्याने धडकी भरवली, आक्षेपांचे काय झाले, नागरीकांचा प्रश्न...!
शहराच्या प्रारुप आराखड्याने धडकी भरवली, आक्षेपांचे काय झाले, नागरीकांचा प्रश्न...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) 7 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीने शहराचा प्रारुप आराखडा जाहीर केला यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. आम्ही दाखल केलेल्या आक्षेपांचे काय झाले हा प्रश्न आता नागरीक विचारत आहेत. हा आराखडा पाहण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात आज सकाळपासून नागरीकांनी गर्दी केली होती. आपल्या घरावर पुन्हा आरक्षण पडले का हे मोबाईलची बॅटरी सुरू करुन पाहत होते. आरेफ काॅलनी ग्रीन झोन झाल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. माजी नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आता संबंधित नागरीकांना प्रारुप आराखड्यास आक्षेप असेल तर नगरविकास मंत्रालयाकडे अथवा न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे. नूर काॅलनी येथे उद्यानानासाठी नवीन आराखड्यात आरक्षण टाकण्यात होते तेथे आधीच 80 ते 90 घरे आहेत. नागरीकांनी आक्षेप दाखल केले होते. मी वकीलही लावला होता. सुनावणीलाही हजर होतो. परंतु बदल काही झाला नसल्याचे शेख रफीक यांनी सांगितले.
पोलिस काॅलनी, टिव्ही सेंटर रोडजवळ अलकबीर हाउसिंग सोसायटी आहे त्यासमोर रोड मंजूर होता. आक्षेप टाकल्यानंतर त्या रोडला या प्रारुप आराखड्यात मान्यता दिली आहे यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही समाधानी आहोत असे एम.आर.खान यांनी सांगितले.
मार्च महीन्यात अगोदर प्रसिद्ध झालेल्या आराखड्यावर 8500 आक्षेप दाखल झाले होते. त्यातील 229 आक्षेप स्विकारण्यात आले. अशी माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
एका रस्त्यासाठी, मैदान, शाळेसाठी आरक्षण पडल्याने शेकडो जणांनी आक्षेप घेतला होता. एकाच आरक्षणावर शेकडो आरक्षण आपोआप निकाली निघाले असा दावाही अधिकारी करत आहे. हा प्रारुप आराखडा शासनाने मंजूर केला तर 20 वर्षात शहराची लोकसंख्या 37 लाख होईल हे गृहीत धरून बणवला आहे. शासनाला वाटले आक्षेपांवर सुनावणी घ्यावी तर घेवू शकतात नसता मंजूरीसाठी वेळ पण लागू शकतो अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
नागेश्वरवाडीत उद्यानासाठी आरक्षण पडल्याने घर जाण्याचा धोका आहे. त्यावर आक्षेप नोंदवला समितीसमोर बाजू मांडली होती. आता नकाशातून उत्तर मिळाले नाही अशी माहिती नकाशा बघण्यासाठी आलेल्या मंजूषा लहिरे यांनी दिली.
शहरातील रस्ते, उद्याने, मैदान, शाळेसाठी आरक्षण टाकल्याने ग्रीन झोनमध्ये जमीन गेल्याने चिंतेत असणा-या नागरीकांनी आज प्रारुप आराखडा बघण्यासाठी गर्दी केली होती. दाखल केलेल्या आक्षेपांनंतर काही बदल झाला का ते बारकाईने नकाशा बघत होते. काही नागरिकांच्या मनात धडकी भरली होती. तर काहींना या नकाशात काही समजत नसल्याने एक दुस-यांना विचारत होते. माझे घर वाचले का हि शंका मनात असताना मात्र नागरीकांना यांचे उत्तर मिळाले नाही. सांगण्यासाठी कोणतेही अधिकारी कर्मचारी येथे उपलब्ध नव्हते.
नागरीकांनी शंका दुर करण्यासाठी महापालिकेच्या समोरील एका झेरॉक्सच्या दुकानावरुन एका सेक्टरचा आराखडा आठशे रुपयांनी विकत घेतला. त्या आराखड्यात काही धार्मिक स्थळ आरक्षणामुळे बाधित होणार होते. त्यांचे काय झाले ते आरक्षण काढले का याचाही अभ्यास करावा लागेल असेही येथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. सुनंदा काॅलनी येल्लो झोनमध्ये आल्याचे नकाशात दिसत आहे असे येथील नागरिकांनी सांगितले.
मार्च महीन्यात आक्षेप व हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर तज्ञांच्या शिफारशीनुसार तयार केलेला शहराचा प्रारुप आराखडा शासनाला सादर केला. महापालिकेच्या वेबसाईटवर व महापालिकेच्या इमारतीत भींतीवर लावून नागरीकांना बघण्यासाठी लावला आहे. या आराखड्यावर शासनस्तरावर सुनावणी होते की मंजुरी दिली जाते हे बघावे
लागेल.
What's Your Reaction?