तिसऱ्या यादीत एमआयएमचे आठ उमेदवार, आतापर्यंत 20 उमेदवारांची घोषणा, मंगळवारी कळेल किती उमेदवार रिंगणात...
तिसऱ्या यादीत एमआयएमचे आठ उमेदवार... आतापर्यंत 20 उमेदवारांची घोषणा... मंगळवारी कळेल किती उमेदवार रिंगणात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - महापालिका निवडणुकीसाठी मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) ने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत आठ उमेदवारांची नावे आहेत. आतापर्यंत 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. प्रभाग 6 मधून नर्गिस बेगम अब्दुल सलीम, मेराज खान पठाण, प्रभाग 1 मधून झिनत बेगम युनुस पटेल, प्रभाग 3 मधून डाॅ.रंजना शेजवळ, प्रभाग 13 जोहरा समीर बिनहैदरा, प्रभाग 14 फेरोज मोईनोद्दीन खान, प्रभाग 28 मनोज वाहुळ यांना उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?