गेल्या अडीच वर्षांत सर्वाधिक विकासकामे मध्य मतदारसंघात झाली - प्रदीप जैस्वाल

गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक विकास कामे मध्य मतदार संघात - प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या काळात सर्वधिक विकास कामे राज्यभरात झाली, मध्य मतदार संघात देखील या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. अशी माहिती मध्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा परिसरात निघालेल्या पदयात्रेदरम्यान दिली.
प्रदीप जैस्वाल यांनी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, विद्युत कॉलनी परिसरात आज आपल्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला. यावेळी नागरिकांनी देखील झालेल्या कामांबद्दल प्रदीप जैस्वाल यांचे आभार मानले, तर आपल्या काही समस्या देखील मांडल्या. गेल्या अडीच वर्षांच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात, प्रदीप जैस्वाल यांनी अनेक महत्त्वाची विकासकामे राबवली आहेत. यात रस्ते रुंदीकरण, जलवाहन योजनेचे प्रगल्भीकरण, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे, तसेच शालेय क्षेत्रात सुधारणा करणारी पावले घेतली गेली आहेत. या विकासकार्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे उत्साही नागरिकांनी प्रदीप जैस्वाल यांच्या या पदयात्रे दरम्यान ठिकठिकाणी फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. काही महिलांनी औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांनी शॉल आणि पुष्पहार घालत प्रदीप जैस्वाल यांचे स्वागत केले.
या पदयात्रेला विश्वनाथ राजपुत, नागराज गायकवाड, कय्युम शेख, नरेंद्र अग्रवाल, देवा सलामपुरे, नितीश कबलीये, राजेश डोंगरे, युवराज डोंगरे, अशोक विधाते, लखन सलामपुरे, आयुष बरेटीये, धीरज गुज्जर, कैलास पुसे, संजय फतेलष्कर, संदीप थोरात, प्रतिभा जगताप, मनीषा मुंढे, लता त्रिवेदी, माधुरी लहरे, सुनीता रिंधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






