मतविभाजनाचे व्हायरस थांबवा, पंधरा मिनटांची आठवण मोठे ओवेसींनी काढली...!
मत विभाजनाचे व्हायरस थांबवा, पंधरा मिनटांची मोठ्या बंधूंनी सुध्दा काढली आठवण....
मोदींच्या एक है तो सेफ है च्या वक्तव्यावर ओवेसींचे प्रत्यूत्तर...!
वक्फ सुधारणा बील मंजूर होऊ देणार नाही, सिएए एनआरसी सारखे देशव्यापी आंदोलन छेडणार, विधानसभेत अल्पसंख्याक समाजाची आवाज उठवण्यासाठी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे केले भावनिक आवाहन, एकजुटीने मतदान करुन भाजपा, शिंदे सेना, उध्दव सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला हरवा, विरोधात उभे असलेलेले मुस्लिम उमेदवारांवर भडकले म्हणाले हे गणिते जुळवण्यासाठी व्हायरस पसरवतील....15 मिनटाची आठवण करून देत त्यांनी सांगितले आता 9 वाजून 12 मिनटे झाली 15 नाही, हर्सुल येथील कचरा डेपोमुळे स्थानिकांना किती त्रास आहे तेथे मोदींचा हेलिकॉप्टर उतरवा तेव्हा कळेल त्यांच्या सरकारने काय काम केले....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्य, औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नासेर सिद्दीकी, इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आज एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ.खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी हर्सुल येथे जाहिर सभा घेतली. याप्रसंगी मतविभाजनाचे व्हायरस थांबवा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे व काँग्रेसवर कडाडले. मोदींनी जाहीर सभेत केलेले वक्तव्य "एक है तो सेफ है" या वक्तव्यावर प्रत्यूत्तर देताना सांगितले भारतात अनेक जात पंथ राहतात. त्यांचे धर्म व संस्कृती वेगळी आहे. आपली संस्कृती कोणी सोडू शकत नाही. एकचा अर्थ न्याय आहे तर इंडिया सेफ आहे. संविधान आहे तर सन्मान आहे. म्हणून मी म्हणतो "अनेक आहे तो अखंड आहे" राज्यात मराठा ओबीसी भांडणे लावण्याचे काम भाजपा करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर जे लढा दिला त्यांना मी सलाम करतो. मराठा समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले. आपल्या मागणीसाठी सरकारला घेरले हे शक्य झाले एकजुटीने म्हणून एमआयएमने एकजूट दाखवून दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आपली आवाज संसदेत इम्तियाज जलील यांच्या रुपाने उठत होती ती आवाज बंद करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन त्यांचा पराभव केला. ते लोकसभेत विजयी झाले असते तर वक्फ सुधारणा बील 2024 ला कडाडून विरोध केला होता. आता संधी चालून आली आहे इम्तियाज जलील व नासेर सिद्दीकी यांना निवडून आणण्याची. या दोघांचा पराभव करण्यासाठी भाजपा व शिंदेसेना यांच्याशी हातमिळवणी करून अनेक मुस्लिम उमेदवार मतविभाजनासाठी उभे आहेत जिंकण्यासाठी नाही. कोविडच्या व्हायरस प्रमाणे 15 नोव्हेंबर पासून ते व्हायरस पसरवतील व मतांची गणितांची आकडेमोड करतील कसा विजय होईल एमआयएमचा. अशा भुलथापांना बळी न पडता इम्तियाज जलील व नासेर सिद्दीकी यांना निवडून आणा असे भावनिक आवाहन करत विरोधकांना त्यांची जागा दाखवा असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले प्रेशित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात गरळ ओकणारे विरोधात मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चाची हवा काढण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे काही नेत्यांनी प्रयत्न केला. तरी पण मी इम्तियाज जलील यांना धीर दिला व हा मोर्चा यशस्वी झाला. मी इम्तियाज जलील यांचे ऐकतो असा आरोप करण्यात आला. त्यांना उत्तर देताना ओवेसींनी म्हटले मी त्यांची सल्ला घेतो फायनल निर्णय मीच घेतो. पक्षाने येथे एक इमारत कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर उभी केली आहे याला पाडण्याचे मनसुबे यशस्वी होऊ देऊ नका. एकजुटीने काम करा व राज्यातील सर्व उमेदवारांना निवडून आणून आपली आवाज विधानसभेत उठवण्यासाठी पाठवा. यांना निवडून दिले तर कोणाचीही हिंमत होणार नाही प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात बोलण्याची व मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारणार असे वक्तव्य करणाऱ्यांना चपराक बसेल. थोडे थांबा भाजपा व महायुतीची सत्ता आली नाही तर ते तुरुंगात असतील असा इशारा त्यांनी दिला. वक्फ सुधारणा बील संसदेत पारित होऊ देणार नाही गरज पडली तर सिएए एनआरसी सारखे देशव्यापी तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. शहर पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. रोजगार नाही, रुपयांची किंमत कमी होत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे शिंदे सरकारने आपल्या खिशातून दिले नाही तो जनतेचा पैसा आहे. त्यांनी दिलेल्या पैसा ठेवा, परंतु लाडक्या बहीणी एमआयएमला मते देणार आहे. अल्पसंख्याक, ओबीसी व विविध योजनेचे पैसे रोखून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले. असा आरोप सरकारवर त्यांनी केला.
जाहीर सभेत व्यासपीठावर इम्तियाज जलील, नासेर सिद्दीकी, माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित
होते.
What's Your Reaction?