पोलीस आयुक्त मनोज लोहिया सेवानिवृत्त, समारोप कार्यक्रमात दिला आठवणींना उजाळा
कुटुंब वत्सल अन् निखळ मैत्री जपणारे पोलीस आयुक्त लोहिया
अधिकारी, सहकारी आणि मित्र परिवाराकडून आठवणींना उजाळा
एमजीएमच्या रुख्मीणी सभागृहात पार पडला पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचा सेवापूर्ती सोहळा
औरंगाबाद, दि.31(डि-24 न्यूज) भारतीय पोलीस सेवेतील कार्य जेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने निभावली़ तेवढ्याच ताकतीने कुटुंब आणि मित्र परिवाराला पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी जपले. ते पहिलेच पोलीस आयुक्त ठरले जे कर्तव्यावर असताना सेवानिवृत्त झाले. पोलीस खात्यात एक मार्गदर्शक, सहकारी, निखळ मैत्री जपणारा असा तो मनोज लोहिया, अशा शब्दात सहकारी, अधिकारी आणि मित्र परिवाराने त्यांच्या आठवणींमधून उजाळा दिला.
पोलिस आयुक्त मनोज लोहिया 36 वर्षे 11 महिने 2 दिवसांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले, त्यांचा सेवापूर्ती सोहळा रुख्मिणी हॉल (एमजीएम) येथे शुक्रवारी दुपारी 4 वाजाता आयोजित केला होता. यावेळी पत्नी सीमा लोहीया उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त नवनीत काॅवत, पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, अशोक थोरात, सुभाष भुजंग, महेंद्र देशमुख, संपत शिंदे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, संभाजी पवार, आदींची उपस्थिती होती.
एप्रिल 2023 रोजी लोहिया पोलिस आयुक्तपदी रुजू झाले. त्यांनी 1994 ते 96 दरम्यान येथे सहायक पोलिस आयुक्त म्हणून काम केलेले असल्याने ते सर्वपरिचित राहिले. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुका निर्विघ्न पार पडल्या. दरम्यान, लोहिया हे 29 जून 1978 रोजी पोलिस उपअधीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी सातारा, बुलढाणा अशा विविध शहरांमध्ये कर्तव्य बजावले.
What's Your Reaction?