आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर... घाटीत 18 तर नांदेड येथे 31 रुग्ण 24 तासात दगावल्याने संताप

 0
आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर... घाटीत 18 तर नांदेड येथे 31 रुग्ण 24 तासात दगावल्याने संताप

आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, घाटीत 18 रुग्णांचा मृत्यू, नांदेडात आकडा झाला 31, 

घाटीतील प्रसुती वार्ड परिसरात चक्क कुत्रा, औषधांचा तुटवड्यासोबत दुर्गंधी, अस्वच्छता, मग कोठे केले गांधी जयंतीनिमित्त श्रमदान, येथे का झाले नाही श्रमदान, नागरीकांचा प्रश्न...? प्रसुती विभागात नातेवाईकांना औषधी दुकानातून आणावी लागते हजारो रुपयांची औषधी, कच्ची चिठ्ठी नातेवाईकांना परत करावी लागत आहे...

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) दोन दिवसांपासून औषधांविना रुग्णांचा जीव जात असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसत आहे. नांदेडात 24 तासात 31 तर औरंगाबाद येथील मराठवाड्यातील सर्वात मोठे घाटी रुग्णालयात 18 रुग्ण दाखवल्याने खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीका करत आहे. काल घाटी रुग्णालयात दोन शिशु तर आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आज मंगळवारी हा आकडा 18 झाल्याने नातेवाईक हैराण झाले आहेत. उपचारासाठी अनेक रुग्ण विविध वार्डात भरती आहे. परिसरातील खाजगी औषधांच्या दुकानांची चांदी आहे. 

आज नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू झाला. काल सोमवारी 24 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना औषधे मिळत नसल्याने गंभीर आजारी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मिडिया हँडलवर ट्विट केले कालची घटना ताजी असताना प्रशासनाला जाग आली नाही हे दुर्दैव असल्याचे सांगितले. मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे माझ्या संवेदना व्यक्त करतो. दिवंगतांना श्रध्दांजली त्यांनी व्यक्त केली.

 विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेला राज्य सरकार पूर्णपणे जवाबदार धरले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडच्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारवर टीका केली. राज्याची प्रकृती व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. औषध पुरवठा करणाऱ्या एजंसीला निधी मिळत नसल्याचे समोर येत आहे यामुळे शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी या दोन्ही घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गंभीर आजारी रुग्णांना औषधी मिळावे असे आदेश त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.

डि-24 न्यूजने घाटी रुग्णालयातील प्रसुतीसाठी आलेल्या एका नातेवाईकाला विचारले असता त्यांनी सांगितले माझी मुलगी प्रसुतीसाठी दाखल केले आहे. प्रसुतीसाठी लागणारे हॉन्डग्लोव्हज, सलाईन, इंजेक्शन, विविध साहित्य असे 15 ते 20 औषधांची यादी देण्यात आली. घाटी प्रवेशद्वारासमोरील औषधी दुकानातून हे साहित्य घेतले. नाव न सांगता त्याने सांगितले 790 रुपयांची औषधी प्रसुती विभागात आणून दिले. साहित्य देताच ते न वापरता नाॅर्मल डिलिवरी झाली साहित्य परत मागितले दिले नाही व औषधांची चिठ्ठी परत घेतली.

रात्री तीन वाजेदरम्यान प्रसुती वार्ड 24,25,26 समोर एक कुत्रा नातेवाईकांनी उष्टे फेकलेले अन्न खात होता. रात्रीच्या वेळी स्टाफ कमी असते हा कुत्रा भुकेने व्याकूळ असताना शिशु वार्डात गेला तर अप्रिय घटना घडणार नाही का...? एखाद्या नवजात शिशूवर या भुकेले कुत्र्याने हल्ला केला तर कोण जवाबदार...? घाटी प्रशासन लाखो रुपये दर महिन्याला सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करते मग हा कुत्रा कोणत्या मार्गाने आत आला, सुरक्षा रक्षकांनी बघितले नाही का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. घाटी रुग्णालयातील सुरक्षा वा-यावर आहे का...असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले घाटी रुग्णालयातील मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृत्यूचे कारणांची चौकशी केली जाईल. घाटी रुग्णालयात मराठवाडा व अन्य जिल्ह्यांतील जास्त प्रमाणात रुग्ण गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयातून रेफर केलेले येतात. अपघात, विषबाधा असलेले रुग्ण सिरीयसच असतात. घाटीतील डॉक्टर त्यांचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असतात. दररोज दिड ते दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात यामध्ये काही अंशी गंभीर अवस्थेत दाखल रुग्ण दगावण्याची भीती जास्त असते नेहमी घाटी प्रशासन यांचे विशेष ऑडिट करत असते. घाटीत ज्या रुग्णांचा मृत्यू झाला तो औषधांच्या अभावी झाला नाही कारणांची चौकशी केली जाईल. नांदेड येथे घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती पाठवली आहे. तो अहवाल शासनाला सादर केला जाईल असे अधिष्ठाता म्हणाले.

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे घाटी रुग्णालयात दाखल होत आहे घडलेल्या घटनेचा ते जाब विचारणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow