जलवाहिनीचे कामात अडथळा, अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः मनपा आयुक्त रस्त्यावर
जलवाहिणीचे कामात अडथडा टाकणारे अतिक्रमण जमीनदोस्त
अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासक स्वतः रस्त्यावर
औरंगाबाद, दि 31(डि-24 न्यूज )पाणीपुरवठा लाईन टाकण्याचा कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण तवरीत काढण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले होते. यानिमित्त त्यांनी आज जळगाव रोड, आंबेडकर नगर, देवळाई येथे खडी रस्ता या भागांची पाहणी केली आणि पाईपलाईन टाकण्याचा कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई आजपासूनच सुरू करावी असे देखील आदेश दिले होते.
या आदेशानुसार आज अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळे आणि सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांनी कारवाईची सुरुवात केली आणि जळगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची सुरुवात केली. अतिक्रमण काढल्याबरोबर एमजेपी मार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे करण्याचे काम देखील याच वेळी सुरू करण्यात आले. संध्याकाळपर्यंत जळगाव टी पॉईंट ते सिडको बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मटन दुकान, दोन गॅरेज, टपऱ्या इत्यादी सह एकूण वीस अतिक्रमण काढण्यात आले.
सदर कारवाईत अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, सागर श्रेष्ठ, यशोदा पवार, प्रसाद रोडे यांचे पथक सहभागी झाले होते. पाहणी करताना दोन रसवंती चालकांनी रस्त्यावर रसवंतीचा पूर्ण कचरा टाकल्याने आयुक्त यांनी थांबून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना लगेच दहा हजार रुपये दंड लावला.
शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काही अतिक्रमण धारक हे पाईप लाईन टाकण्याचा कामात अडथळा निर्माण करत होते, याबाबत एमजेपी आणि ठेकेदाराने आयुक्त कडे तक्रार केली होती
.
What's Your Reaction?