सावधान... औरंगाबादेत डोळ्यासोबत डेंग्यू...सतर्क राहा

 0
सावधान... औरंगाबादेत डोळ्यासोबत डेंग्यू...सतर्क राहा

सावधान... औरंगाबादेत डोळ्यासोबत डेंग्यू

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) शहरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. अनेक दिवसांपासून डोळ्यांच्या साथीने थैमान घातले असताना आता शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात 59 संशयित रुग्ण तर 12 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. खाजगी रुग्णालयात सुध्दा तापाचे रुग्णांची गर्दी होत आहे. उपचार घेत असलेले काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याची महापालिका आरोग्य विभागाकडे नोंद नाही. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे असे आवाहन आरोग्य यंत्रणा करत आहे. 

ज्या ठिकाणी डेंग्यू पाॅझिटिव्ह संशयित रुग्ण आढळले आहे त्या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करुन युध्दपातळीवर कोरडा दिवस, औषध फवारणी, धूर देने, अॅबेट ट्रिटमेंट व अन्य उपाययोजना करण्यात येत असून घाबरण्याचे कारण नाही अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

ज्या परिसरात पाण्यात डास अळ्या मोठ्या प्रमाणात आढळतात त्या भागातील हाउस इंडेक्स दररोज मनपाकडून काढण्यात येतो त्या ठिकाणी व्यापक उपाययोजना केल्या जातात. शुक्रवारी संजयनगर बायजिपुरा, रविंद्रनगर, शहाबाजार, मसनतपूर, भारतनगर, सिडको एन-13, काचिवाडा, चाऊस काॅलनी, सिध्दार्थनगर, पदमपूरा भागाचा हाऊस इंडेक्स मध्ये समावेश होता. आज कोणत्या भागाचा समावेश आहे ते नंतर कळले. 

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी घराच्या आसपास पाणी थांबू देवू नका, घरात किटकनाशक औषधांची फवारणी करावी, मोठ्या व छोटे बालकांनी अंगभर कपडे घालावेत, मच्छरदाणीचा उपयोग करावा, डास पळवणा-या औषधांचा वापर करावा, पाण्याचे साठे नेहमी झाकण ठेवावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow