एमआयएमला धक्का... मौलाना महेफुजुर्रहमान यांचा राजीनामा

 0
एमआयएमला धक्का... मौलाना महेफुजुर्रहमान यांचा राजीनामा

एमआयएमला धक्का... पक्षातील गटबाजीला कंटाळून मौलाना महेफुजुर्रहमान यांचा राजीनामा

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) सुरुवातीपासून एमआयएम सोबत असलेले व सध्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदाचा पदावर कार्यरत असलेले मौलाना महेफुजुर्रहमान यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे पक्षाचे सर्वेसर्वा बै.असदोद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलिल यांना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. मौलाना महेफुजुर्रहमान हे एमआयएम पक्षा सोबत सुरुवातीपासूनच जोडले गेलेले आहे पक्षाच्या कार्यालय नसताना सुद्धा त्यांनी आपल्या घरात कार्यालय सुरू करून पक्ष बांधणीसाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नाही तर ते बॅरिस्टर असोद्दीन ओवेसी यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय आहे त्यांनी ओवेसी यांच्यासोबत निवडणुकीसाठी प्रचारही केला आहे. धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले मौलाना महेफुजुर्रहमान यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे पक्षांमध्ये त्यांना वेगळेच वलय होते त्यांच्या राजीनाम्याने एमआयएमला मोठा धक्का बसला आहे त्यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला आहे

त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यांनी मागिल काही वर्षात राज्यात दौरे करून पक्षबांधणी केली आहे. मागील औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्याच्या कमिटीत काम केले. त्यावेळी 26 नगरसेवक निवडून आले होते. मी धर्मगुरू असल्याने राजकारणात वेळ देऊ शकत नाही. पुढील आयुष्य धार्मिक कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांनाही राजकारणात आणायचे नाही अथवा कोणतीही निवडणूक लढायची नाही. एमआयएम पक्षात पदाधिकारी यांनी पक्षाचे काम करताना सहकार्य केले. पक्षातील अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. मौलाना महेफुजुर्रहमान यांनी राजीनामा दिल्याने एमआयएम पक्षाला धक्का बसला आहे. पुढील वर्षी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे त्याची उणीव एमआयएम पक्षाला जाणवेल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow