रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाला सुरुवात, काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ...!
रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू, काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा निष्फळ
आंतरवाली सराटी, दि.30(डि-24 न्यूज)- मराठा आरक्षण व विविध मागणीसाठी आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात बाज टाकून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांनी मागणी पूर्ण होईल अन्न पाणी घेणार नाही असे जाहीर केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल त्यांच्यासोबत विस्ताराने चर्चा केली. पण चर्चा निष्फळ ठरली. जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात सुरु केलेले उपोषण मागे घेण्यासाठी सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे पण सर्वांना त्यांच्या तब्येतीची काळजी आहे त्यांना अगोदरच किडनीचा त्रास आहे. पण मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळाले पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र मिळून त्याचा फायदा आयुष्याच्या जडणघडणीत झाला पाहिजे म्हणून एवढे कठोर पाऊल त्यांनी उचलले असल्याने काळजी वाढली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य मंत्री त्यांची समजूत काढण्यासाठी पुन्हा उपोषणस्थळी दाखल होणार अशी माहिती मिळाली आहे. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
What's Your Reaction?